उपराष्ट्रपती निवडणुकीत NDAचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा मोठा विजय; इंडिया आघाडीची मतं फुटली!

उपराष्ट्रपती निवडणुकीत NDAचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा मोठा विजय; इंडिया आघाडीची मतं फुटली!

नवी दिल्ली | उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर होत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला असून, राधाकृष्णन यांना ४५२ मतं, तर रेड्डी यांना ३०० मतं मिळाली. या विजयामुळे एनडीएच्या ताकदीला अधिक बळकटी मिळाली आहे.

या निवडणुकीत ७८२ खासदारांना मतदानाचा अधिकार होता. त्यापैकी ७६७ खासदारांनी मतदान केलं. मात्र, १५ मतं अवैध ठरली. विशेष म्हणजे, इंडिया आघाडीची १४ मतं फुटली असून ही मतं थेट राधाकृष्णन यांच्या खात्यात जमा झाली. या फुटलेल्या मतांमुळे विरोधी आघाडीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत मिळून एनडीएकडे एकूण ४२७ खासदारांचा पाठिंबा होता. त्याशिवाय जगममोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षानेही राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला. त्यांच्या ११ खासदारांची मतं धरून हा आकडा ४३८ पर्यंत पोहोचत होता. पण प्रत्यक्षात राधाकृष्णन यांना ४५२ मतं मिळाल्याने स्पष्ट झालं की विरोधकांचे १४ खासदार एनडीएच्या बाजूला वळाले होते.

मतदान आणि निकाल

या निवडणुकीत एकूण ७८२ खासदारांपैकी ७६७ खासदारांनी मतदान केले. त्यापैकी १५ मतं अवैध ठरली. निकालानुसार राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली असून, विरोधकांची १४ मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांची एकी कोसळली

एनडीएला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असल्याने राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, विरोधक आपली मतं टिकवून ठेवतील का, हा प्रश्न उपस्थित होता. प्रत्यक्ष मतदानात इंडिया आघाडीची १४ मतं एनडीएकडे गेल्याने विरोधकांच्या एकीला मोठा धक्का बसला आहे.

क्रॉस व्होटिंगचा परिणाम

लोकसभा आणि राज्यसभेत मिळून एनडीएचे ४२७ खासदार आहेत. त्यात जगममोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचे ११ खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने राधाकृष्णन यांची मतसंख्या किमान ४३८ वर पोहोचणार होती. मात्र, अंतिम निकालात त्यांना ४५२ मतं मिळाल्याने विरोधी आघाडीतील किमान १४ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं स्पष्ट झालं.

राजकीय वातावरण

निवडणुकीपूर्वी विरोधकांनी मोठी एकी दाखवली होती. राहुल गांधी यांनी मतांबाबत मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून आंदोलनही केले होते. पण निकालात आलेल्या फुटलेल्या मतांमुळे विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

उपराष्ट्रपतीपदावर विराजमान

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन आता देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांच्या विजयामुळे एनडीएचा आत्मविश्वास आणखी वाढला असून विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्न निर्माण झाला आहे.

या निकालामुळे एनडीएची ताकद अधिक ठळकपणे दिसून आली आहे. तर इंडिया आघाडीसाठी ही निवडणूक एकतेचा अभाव दाखवणारा धक्का ठरली आहे. आगामी राजकारणात या निकालाचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *