40,000 रुपयांखालील Moto फोन्सवर जबरदस्त सूट! फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये ऑफर्स जाहीर
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मोटोरोला कंपनीने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन मॉडेल्सवर जबरदस्त सूट जाहीर केली आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये प्रीमियम ते मिड-रेंज आणि बजेट स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत.
प्लस मेंबर्ससाठी हा सेल 22 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर इतर ग्राहकांसाठी थोड्या वेळाने उपलब्ध होईल. एवढेच नाही तर HDFC आणि ICICI बँक कार्डधारकांना अतिरिक्त सूट मिळणार आहे.
Moto Edge 60 Pro – आता फक्त ₹24,999
मोटोरोला एज 60 प्रो या सेलमध्ये 29,999 रुपयांवरून थेट 24,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यात ट्रिपल रियर 50MP कॅमेरा सिस्टम, 50MP सेल्फी कॅमेरा, मीडियाटेक डायमेंशन 8350 एक्सट्रीम प्रोसेसर आणि दमदार 6000mAh बॅटरी (90W फास्ट चार्जिंग) मिळते.
Moto Razr 60 – ₹39,999 मध्ये प्रीमियम फोल्डेबल
49,999 रुपयांच्या किंमतीचा Moto Razr 60 आता 39,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यात 6.9-इंच LTPO डिस्प्ले (3000 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz रिफ्रेश रेट), 3.6-इंच कव्हर डिस्प्ले आणि पॅनटोन व्हॅलिडेटेड ट्रू कलर कॅमेरा सिस्टम मिळतो. फोल्डेबल डिझाइन आणि AI सपोर्ट हे या फोनचे मुख्य आकर्षण आहे.
Moto Edge 60 Fusion – ₹19,999 ची धमाल डील
22,999 रुपयांचा मोटोरोला एज 60 फ्यूजन या सेलमध्ये 19,999 रुपयांना मिळणार आहे. यात 1.5K ट्रू टोन क्वाड कर्व्ड डिस्प्ले (4500 निट्स ब्राइटनेस), 50MP + 13MP ड्युअल रियर कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4K रेकॉर्डिंग सपोर्ट मिळतो.
Moto G96 5G – ₹14,999 मध्ये बजेट किलर
Moto G96 5G हा बजेट फोन देखील दमदार ऑफरमध्ये उपलब्ध होईल. 17,999 रुपयांचा हा फोन फक्त 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. यात 6.67-इंच pOLED कर्व्ड डिस्प्ले (144Hz रिफ्रेश रेट, 1600 निट्स ब्राइटनेस), Snapdragon 7s Gen2 प्रोसेसर, 50MP Sony कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी (33W चार्जिंग) मिळते.
मोटोरोला चाहत्यांसाठी ही सेल पर्वणी ठरणार आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2025 सेलमध्ये प्रीमियम, मिड-रेंज आणि बजेट फोन्सवर कधी नव्हे एवढ्या आकर्षक किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.