“Pune Crime : आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीवर पोलिसांची धडक कारवाई!”

आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीच्या आर्थिक नाड्या आवळल्या; ५० लाखांची रक्कम गोठवली “Pune Crime : आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीवर पोलिसांची धडक कारवाई!”

पुणे प्रतिनिधी | 6 ऑगस्ट 2025: पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून देणाऱ्या आयुष कोमकर खून प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या चौकशीतून समोर आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या मालमत्तेवर धडक दिली आहे.

५० लाखांहून अधिक रक्कम गोठवली

पोलिसांनी तपासादरम्यान टोळीच्या विविध २७ बँक खात्यांची पडताळणी केली. त्यामध्ये तब्बल ₹५०,६६,९९९ रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. याशिवाय बंडू आंदेकरच्या घरझडतीतून ७७ तोळे सोन्याचे दागिने, साडेअडीच लाखांची रोकड, मोटार, जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे व करारनामे जप्त करण्यात आले आहेत.

वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर भडकला संघर्ष

या संपूर्ण घटनाक्रमाची सुरुवात माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाने झाली. त्यानंतर आंदेकर-गायकवाड टोळीत संघर्ष भडकला. याच पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकरची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात टोळीप्रमुख बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबातील ९ जणांसह एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे.

कटाचा तपास आणि आरोपींची रेकी

पोलिसांच्या तपासात उघड झाले की आंदेकर टोळीने विरोधी गटातील कुटुंबीयांना लक्ष्य करण्याचा कट रचला होता. यासाठी दत्ता काळे याला आंबेगाव पठार भागात पाठवून आरोपींच्या घरांची रेकी करण्यात आली. काळेने मिळालेली माहिती कृष्णा आंदेकरला व्हॉट्सॲप कॉलद्वारे दिली, मात्र कृष्णाने तो कॉल उचलला नाही. नंतर तांत्रिक तपासातून स्पष्ट झाले की टोळीने पाच शस्त्रे घेऊन सात ते आठ जणांना पाठविल्याची चर्चा झाली होती.

पोलिसांची तत्पर कारवाई

भारती विद्यापीठ पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे हा कट मोठ्या प्रमाणावर उधळला गेला. तरीही टोळीने आयुष कोमकरचा खून करून आपला बदला उगवला. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेतून पुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

आयुष कोमकर खून प्रकरणामुळे आंदेकर-गायकवाड टोळी संघर्षाने नवे वळण घेतले आहे. मात्र, पोलिसांनी आर्थिक घडामोडींवर केलेल्या धडक कारवाईमुळे टोळीच्या कणा मोडण्यास मोठा हातभार लागणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता अधिक वेगाने होणार असल्याचे संकेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top