सोनवडी ग्रामपंचायत,ता-दौंड,जि-पुणे येथील महिलांच्या बचत गटा विरोधात राष्ट्रवादी कॉं.(शरद पवार) दौंड मधील मोठ्या नेत्याचे षडयंत्र

बारामती लोकसभा मतदारसंघा च्या लोकप्रिय खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे या नेहमी महिला सक्षमीकरणा बद्दल बोलत असतात आणि गतकाळात त्यांची भूमिका देखील तशीच राहिलेली आहे,परंतु दौंड तालुक्यातील सुप्रियाताई सुळे यांचेच कट्टर समर्थक आणि त्यांच्या पक्ष्याची भूमिका तालुक्यात मांडणारे एक मोठे नेतेच या सोनवडी येथील येसुबाई महिला गटाच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत.

गाव गाडा टीम ला मिळालेल्या माहिती नुसार या नेत्याच्या सांगण्यावरून त्यांच्या ताब्यात असलेल्या विविध कार्यकारी सोसायटीने येसुबाई महिला बचत गट, सोनवडी ला मिळालेल्या रेशन धान्य दुकान मंजुरी विरुद्ध आणि ज्यांनी हा निर्णय दिला त्या पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या विरोधात पुणे जिल्हा आयुक्त यांच्या कडे अपील दाखल केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गेल्या ४ दिवसांपुर्वी पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या ऑफिस मध्ये या नेत्याच्या १०-१२ कार्यकर्त्यांनी रेशन धान्य दुकान मंजुरीच्या निर्णया विरोधात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.

या नेत्यांना मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये आमदारकी लढवण्याची तीव्र ईच्छा व्यक्त केली होती,परंतु त्यावेळी पक्ष्याचे अध्यक्ष व देशाचे नेते पवार साहेबांनी यांची उमेदवारी डावलली होती,या नेत्याच्या असल्या महिला विरोधी धोरणांमुळेच कदाचित पक्षाचे अध्यक्ष पवार साहेबांनी यांना विधानसभेला तिकीट दिले नसावे अशा भावना सामान्य जनता व्यक्त करताना दिसते.

माननीय खासदार सुप्रिया सुळे यांच्या महिला धोरणा विरोधात जर त्यांचाच पक्षाचा नेता अशी महिला विरोधी भूमिका घेऊन तिलांजली देत असेल, तर आधीच राज्यातील राजकारणातून कमी होत चाललेला पक्ष दौंड तालुक्यातून देखील हद्दपार होईल अशी चर्चा दौंड तालुक्यातील महिला करताना दिसत आहेत.

महिलांच्या न्याय हक्कासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला हितासाठी वेळीच अश्या नेत्यांना आवर घालणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top