सातारा महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात फडणवीस यांचा इशारा: ‘कुणालाही सोडणार नाही -कठोर कारवाई होणार’!

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले की, “या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही. दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.”

फडणवीस यांनी सांगितले की ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर तात्काळ कारवाई सुरू आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आधीच निलंबित करण्यात आले असून, तपास वेगाने सुरू आहे.

त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना आवाहन केले की, “या गंभीर घटनेचं राजकारण करू नये. पीडितेला न्याय मिळवून देणं हीच प्राथमिक जबाबदारी आहे.”

संशयित आरोपी प्रशांत बनकर चार दिवसांच्या पोलीस कोठडीत

फलटण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात आरोपी प्रशांत बनकरला हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, तर बचाव पक्षाने कमी कालावधीची कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातून झाली आरोपीची अटक

महिला डॉक्टर आत्महत्येनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. प्रशांत बनकरला पुण्यातून अटक करण्यात आली.
महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते की, प्रशांत बनकर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. या पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू – गोपाल बदने अद्याप फरार

या प्रकरणातील दुसरा आरोपी पीएसआय गोपाल बदने अजूनही फरार आहे. त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर येथे मिळाले होते.
माहितीनुसार, तो बीड जिल्ह्याचा असल्याने पोलिसांनी त्याचा शोध बीड परिसरातही सुरू केला आहे. अनेक टीम त्याच्या मागावर आहेत, पण अद्याप त्याला अटक झालेली नाही.

घटनेचा पार्श्वभूमी आणि तपासाची दिशा

या आत्महत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील तरुण डॉक्टरांवरील मानसिक दडपण, कामाचा ताण आणि काही वरिष्ठांचा गैरवर्तनात्मक दबाव हे गंभीर मुद्दे पुन्हा पुढे आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर कठोर भूमिका घेत तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

फलटणमधील ही घटना समाजाला हादरवणारी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानानुसार, “कुणालाही सोडले जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत तपास सुरू राहील.”
राज्य सरकारने या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाईची भूमिका घेतली असून, महिला डॉक्टरच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top