दौंड जिल्हा परिषद निवडणूक – पुन्हा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले बाशिंगधारी नेते पुन्हा सज्ज!
दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक राजकारणात कायम चर्चेत असलेले एक नाव — जे प्रत्येक निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरतं — पुन्हा एकदा सज्ज झालं आहे.
एक वर्षापूर्वी याच नेत्याने आमदारकीसाठी जोरदार तयारी केली होती,अर्थात ती देखील त्यांच्या म्हणण्या नुसार. एक ही रुपया खर्च न करता यांनी तेंव्हा प्रचाराची धडाकेबाज सुरुवात ही केली होती, पण गड्याने ऐनवेळी माघार घेतली. तालुक्यातील लोकाना आता त्यांच्या या फुसक्या घोषंनांची ‘शेवटच्या क्षणी माघारी’ची इतकी सवय झाली आहे की, जणू निवडणूक आली की यांचा माघार घेणं ठरलेलंच असतं!
यंदाची रणनीती
यंदा मात्र परिस्थिती थोडी बदलली आहे. आपला मतदारसंघ राखीव झाल्यामुळे या नेत्याने दुसऱ्या मतदारसंघात लढवण्याचा चंग बांधला आहे. नवीन क्षेत्रात स्वतःची ताकद आजमावण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. प्रचाराचं रणांगण सजलं आहे, बॅनर-फ्लेक्स झळकू लागले आहेत, आणि ‘बाशिंगधारी नेता’ पुन्हा चर्चेत यायला पाहत आहे.
काय आहे लोकांचे मत
तालुक्यातील जाणकार राजकीय मंडळी मात्र वेगळं चित्र दाखवत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, यंदाही ही मोहिम ‘फुसका बार’ ठरू शकते. कारण स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि नव्या मतदारसंघातील जनतेचा प्रतिसाद अजूनही अनिश्चित आहे. तरीही, या नेत्याची तयारी पाहून तालुक्यातील लोकांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच विरंगुळा होताना दिसत आहे.
बाशिंग धारी नेत्याचे रील पण सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत, यंदा नक्की, यंदा ठरलंय,यंदा डायरेक्ट जिल्हा परिषद अध्यक्ष असली विशेषणे त्यात दिसत आहेत परंतु काही जाणकार मंडळी तर म्हणत आहेत यांनी यंदा फक्त फॉर्म भरूनच दाखवावा,तर काही लोक म्हणत आहेत यांनी विधान सभेला विश्वासघात केला आहे त्याचे उट्टे आम्हाला काढायचे आहे.
राजकारणात अंदाज बांधणं कठीण असतं, पण दौंडमधील हा ‘बाशिंगधारी नेता’ गेल्या विधानसभेला आपल्याच पक्ष्यातील नेत्यावर केलेल्या विश्वासघाता मुळे स्वतःची पूर्ण विश्वासार्हता गमावून बसला आहे. आणि अशातच याला आता खुला प्रवर्ग जिथे आला आहे तिथे जिल्हापरिषदेला उभे राहण्याचे डोहाळे पडू लागले आहेत. प्रत्येक निवडणुकीला त्यांचं “तयार आहे!” हे वक्तव्य लोकांच्या कानावर पडतं, पण ऐनवेळी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला हे कानावर येते.
आता पाहायचं इतकंच — यंदा खरंच बाशिंग बांधून मैदानात उतरतात का, की पुन्हा एकदा तालुक्याला माघारीचं दृश्य बघायला मिळतं?