पूणे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीच स्वतःच्या आदेशाचे पालन नाकारल्याने दौंडमध्ये खळबळ!

दौंडमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी पुणे यांच्या निर्णयामुळे संभ्रम; स्वतःच दिलेला आदेश पाळण्यास नकार

दौंड तालुक्यातून प्रशासनातील गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आपल्या आदेशाचेच पालन करण्यास नकार दिल्याने पुरवठा विभागात व नागरिकांमध्ये आश्चर्य व संभ्रम निर्माण झाला आहे.

दौंड मौजे सोनवडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील नवीन रास्त भाव धान्य दुकान सोनवडी गावातील येसूबाई स्वांसहायता महिला समूह यांना दिनांक 25/09/2025 रोजीच्या आदेशानुसार मंजूर करून त्यांच्या कडून परवाना फी अनामत रक्कम भरून घेऊन देखील, त्यांनीच दिलेल्या एका महिन्याच्या आत दुकान चालू करण्याच्या आदेशातील अटीचे पालन न करता संबंधित महिला बचत गटाच्या महिलांना 40 दिवस कालावधी उलटून गेला तरी नवीन रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना तयार करण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक प्रलंबित ठेऊन, वारंवार जिल्हा पुरवठा ऑफिस मध्ये चकरा मारण्यास भाग पाडले आहे.

सदर महिलांनी परवाना प्रक्रिया प्रलंबित ठेवण्याचे कारण विचारले असता त्यांनी आयुक्त ऑफिस ला तुमच्या आदेशाच्या विरोधात अपील चालू आहे असे सांगितले. परंतु सदर च्या अपील मध्ये केसच्या पाहिल्याच तारखेला उपआयुक्त पुरवठा यांनी असे सांगितले होते की, परवाना बनवण्याची प्रक्रिया आणि आपिलची केस याचा काही संबंध नाही. तसेच शासनाच्या कुठल्याही नियमात देखील नाही, तरीदेखील जिल्हा पुरवठा अधिकारी पुणे यांनी फक्त महिलाना त्रास देण्यासाठी न काही तरी आर्थिक लाभ मिळेल या हेतूने मौजे सोनवडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील नवीन मंजूर झालेल्या रास्त भाव धान्य दुकान याची परवाना बनवण्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवली आहे का..? असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला दिसतो. स्थानिक नागरिक व संबंधित पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांच्या या विरोधाभासी भूमिकेमुळे शासकीय प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

काही नागरिकांनी सांगितले की, एकीकडे आदेश दिले जातात आणि दुसरीकडे त्या आदेशांनाच हरकत घेतली जाते, यामुळे साध्या लोकांमध्ये गोंधळ वाढतो. संबंधित प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून पुढील कार्यवाहीची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आदेशांमध्ये सातत्य ठेवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top