केडगाव–चौफुला परिसरात एअरटेल नेटवर्क झाले ठप्प! तर हजारो ग्राहक संतप्त!

केडगाव–चौफुला परिसरात एअरटेलची रेंज गायब! हजारो ग्राहक त्रस्त, दिवसभर सेवा ठप्प!

केडगाव व चौफुला परिसरातील एअरटेल ग्राहकांनी आज दिनांक : 20 नोव्हेंबर 2025 दिवसभर नेटवर्क नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन केला. दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एअरटेलची रेंज पूर्णपणे गायब झाली होती. फोन न लागणे, इंटरनेट बंद पडणे आणि सतत ‘No Service’ दाखवणारा मोबाईल यामुळे परिसरातील हजारो ग्राहक अडचणीत आले.

एअरटेलची रेंज दुपारी गायब – रात्रीपर्यंत सेवा बंद

आज दि. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी अगदी अचानक एअरटेल नेटवर्क गायब झाले.
रात्री साडेआठपर्यंत सेवा सुरु न झाल्याने लोकांचा वैताग शिगेला पोहोचला.
काही लोक तातडीच्या कामासाठी बाहेर पडून इतरांच्या फोनचा वापर करताना दिसले.

या परिसरात एअरटेलची रेंज गायब होण्याची समस्या नवी नाही. परिसरातील एअरटेल टॉवर वीज गेल्यानंतर काही तासांत बंद पडतो, आणि त्यानंतर अनेक तास नेटवर्क परत येत नाही. परिणामी एअरटेल वापरकर्त्यांना वारंवार इंटरनेट बंद पडणे आणि कॉल व्यवस्थित न लागणे अशा अडचणींना सामोरे जावे लागते.

आजची परिस्थिती मात्र आणखी बिकट होती. बारा वाजता गेलेली रेंज रात्री उशिरापर्यंत सुरू न झाल्याने हजारो लोकांचे आउटगोईंग आणि इनकमिंग कॉल पूर्णपणे बंद होते. अत्यावश्यक कामे अडून राहिल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले. अनेकांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक ग्रुपमध्ये एअरटेल सर्व्हिसविरोधात नाराजी व्यक्त केली.

वारंवारच्या नेटवर्क समस्यांमुळे आता ग्राहक एअरटेलपासून दूर जात आहेत. अनेकांनी जिओ किंवा वोडाफोन मध्ये सिम पोर्ट करण्यास सुरुवात केली असून, एअरटेलने तातडीने सेवा सुधारली नाही तर ग्राहक गमावण्याची शक्यता वाढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top