Share Market : 1 जानेवारीपासून सगळं बदलणार
गुंतवणूकदारांसाठी मोठा निर्णयभारताच्या भांडवली बाजारात एक मोठा बदल 1 जानेवारी 2026 पासून लागू होत आहे. बाजार नियामक SEBI ने रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच REITs ला ‘इक्विटी’ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या बदलामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांपासून फंड हाऊसेसपर्यंत अनेकांना फायदा होणार आहे.
SEBI चा मोठा निर्णय:
REITs आता ‘इक्विटी’मध्येSEBI च्या ताज्या नियमानुसार—REITs ला 1 जानेवारी 2026 पासून इक्विटी म्हणून मान्यताम्युच्युअल फंड आणि SIF ला REITs मध्ये अधिक गुंतवणूक करण्याची परवानगीयामुळे गुंतवणूकदारांना विविधीकरणाच्या अधिक संधी उपलब्धहा बदल भारतीय रिअल इस्टेट आणि कॅपिटल मार्केटसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
InvITs वर जुनाच नियम लागूSEBI ने स्पष्ट केले आहे की—Infrastructure Investment Trusts (InvITs) पूर्वीप्रमाणे चहायब्रिड श्रेणीत (equity + debt) राहतील InvITs च्या वर्गीकरणात कोणताही बदल नाही.
ग्रॅंडफादरिंग नियम-
जुन्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नाहीगुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे—31 डिसेंबर 2025 पर्यंत केलेल्या REITs गुंतवणुकीवर नवीन नियम लागू होणार नाहीतम्हणजेच आधीच्या REIT गुंतवणुकींना सूट मिळणारम्युच्युअल फंडांची संस्था AMFI आता REITs समाविष्ट करण्यासाठी लिस्ट अपडेट करणार आहे.
योजनांमध्ये बदल करण्याची वेळ-
AMC ना नवी कागदपत्रं तयार करावी लागणारनियमांनुसार—सर्व Asset Management Companies (AMCs) यांनीत्यांच्या स्कीम दस्तऐवजांचे अद्यतन करणे आवश्यकREITs च्या नव्या वर्गीकरणानुसार माहिती द्यावी लागेल.
REITs निर्देशांकात कधी येणार?
SEBI ने सांगितले आहे की—1 जुलै 2026 नंतरच REITs ना स्टॉक मार्केट इंडेक्समध्ये समाविष्ट केले जाईलम्हणजे REITs चा Nifty किंवा Sensex सारख्या निर्देशांकांमध्ये अधिकृतपणे समावेश अजून काही महिन्यांनी होणार आहे.
गुंतवणूकदारांना काय फायदा? REITs इक्विटीमध्ये आल्याने त्यांची लिक्विडिटी वाढेल.
- म्युच्युअल फंडांमधून जास्त गुंतवणूक येईल.
- गुंतवणूक पोर्टफोलिओचे विविधीकरण अधिक प्रभावी होईल.
- रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्वासार्हता वाढेल.
2026 मध्ये येणार मोठा बाजार बदल – SEBI च्या या नवीन नियमांमुळे शेअर बाजारातील पारदर्शकता, विविधीकरण आणि गुंतवणुकीची गुणवत्ता वाढणार आहे. विशेषतः REITs मध्ये गुंतवणुकीचा मार्ग अधिक खुला होणार असून अनेक गुंतवणूकदारांना यातून दीर्घकालीन फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.