भारत सरकारचा नवा निर्णय: सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ प्री-इन्स्टॉल सायबर सुरक्षा अ‍ॅप झाले अनिवार्य!

भारत सरकारने देशातील मोबाईल वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेला प्राधान्य देत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. दूरसंचार मंत्रालयाने सर्व स्मार्टफोन कंपन्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये ‘संचार साथी’ हे सरकारी सायबर सुरक्षा अ‍ॅप प्री-इन्स्टॉल करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे हे अ‍ॅप वापरकर्त्यांना डिलीट किंवा डिसेबल करता येणार नाही.

भारतामध्ये सध्या 112 कोटींहून अधिक मोबाईल वापरकर्ते आहेत आणि या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची गरज आणखी वाढली आहे. 2023 मध्ये लाँच केलेले ‘संचार साथी’ अ‍ॅप चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यात मोठी मदत करते. सरकारी आकडेवारीनुसार या अ‍ॅपच्या मदतीने आतापर्यंत 7 लाख हरवलेले मोबाईल शोधले गेले असून त्यातील 50 हजार मोबाईल केवळ ऑक्टोबर महिन्यात परत मिळाले आहेत.

दूरसंचार मंत्रालयाने स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना यासंबंधी २८ नोव्हेंबर रोजी आदेश दिल्याचे समोर आले आहे. या आदेशानुसार मोबाईल कंपन्यांनी ९० दिवसांच्या आत हे अ‍ॅप नवीन फोनमध्ये समाविष्ट करणे बंधनकारक असेल.

‘संचार साथी’ अ‍ॅप का महत्त्वाचे?

‘संचार साथी’ हे भारत सरकारचे अधिकृत सायबर सुरक्षा अ‍ॅप असून त्याचे प्रमुख उद्देश असे आहेत:

  • हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात मदत
  • फोनची बेकायदा री-सेल टाळणे
  • मोबाइलच्या IMEI संबंधित फसवणूक रोखणे
  • सायबर सुरक्षेची पातळी वाढवणे

सरकारच्या आकडेवारीनुसार, या अ‍ॅपच्या मदतीने आतापर्यंत ७ लाखांहून अधिक मोबाईल परत मिळाले आहेत. फक्त ऑक्टोबर महिन्यातच ५०,००० हरवलेले मोबाईल शोधण्यात यश मिळाले आहे.

हे अ‍ॅप २०२३ मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि आता ते सर्व स्मार्टफोनमध्ये अनिवार्य होणार आहे.

जुने स्मार्टफोन वापरणारे ग्राहक काय?

जे फोन आधीपासून वापरात आहेत, त्यामध्ये हे अ‍ॅप थेट प्री-इन्स्टॉल नसेल. पण:

कंपन्यांना सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ‘संचार साथी’ अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल.

अपडेट करताच हे अ‍ॅप आपोआप फोनमध्ये दिसेल आणि ते डिलिट करता येणार नाही.

Apple, Samsung, Xiaomi यांची भूमिका?

सध्या मोठ्या कंपन्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
ॲपलचे धोरण तृतीय पक्ष अ‍ॅप प्री-इन्स्टॉल न करण्याचे आहे. त्यामुळे Apple कसा प्रतिसाद देईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

भारतासाठी हा निर्णय का महत्त्वाचा?

  • देशात ११२ कोटींहून अधिक मोबाईल वापरकर्ते
  • जगातील सर्वात मोठे मोबाइल उत्पादन केंद्र – भारत
  • वाढते सायबर गुन्हे आणि IMEI क्लोनिंग
  • फोन चोरीचा वाढता धोका

या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘संचार साथी’ अ‍ॅप मोबाईल सुरक्षा मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top