मुंबई- आज मराठमोळी अभिनेत्री आणि सर्वांची आवडती सई ताम्हणकर यांचा 39 वा वाढदिवस आहे. सई ही अभिनेत्री आता केवळ मराठी सिनेमांपुरतीच मर्यादित राहिलेली नसून बॉलीवूडकरांची सुद्धा लाडकी झाली आहे. आजच्या घडीला मराठी सिनेमांमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून सई ला ओळखले जाते. तिला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, हिंदी आणि मराठी फिल्मफेअर यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सई ताम्हणकरला आतापर्यंत कितीजणांनी प्रपोज केलंय? ब्रेकअपबद्दल काय बोलली अभिनेत्रीSai Tamhankar Birthday : अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेऊ.
३९वा वाढदिवस साजरा करते आहे. सई तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत खासगी आयुष्यासाठी चर्चेत येत असते. तिचे सतत कोणा ना कोणासोबत नाव जोडले जात असते. काही महिन्यांपूर्वी ती निर्माता अनिश जोगला डेट करत होती. पण मी ती वेगळी झाली. दरम्यान एका मुलाखतीत तिने तिला किती जणांनी प्रपोझ केलं, याबद्दल सांगितले.
भावड्याची चावडी या शोमध्ये सई ताम्हणकरने तिला आतापर्यंत किती मुलांनी प्रपोझ केलं, याबद्दल सांगितलं होतं. मला खूप मुलांच्या डोळ्यात दिसत होतं की त्यांना मला प्रपोझ करायचं आहे. पण त्यांनी तसं बोलून दाखवलं नाही असं ती म्हणाली होती की, लोकांना वाटतात तितके मला प्रपोज आलेले नाहीत.
सई ताम्हणकर बोलली आपल्या ब्रेकअपबद्दल :
सईने यांनी अमेय गोसावी यांच्या सोबत लग्न केले होते. पण त्यांचे नाते फार टिकू शकले नाही. दोन वर्षांच्या संसारानंतर ते काही काळातच विभक्त झाले. त्यानंतर सई ताम्हणकर आणि अनिश जोग यांचे नाते खूप चर्चेत आले होते. साधारण दीड वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले. दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसले. पण अचानक एकेदिवशी सईने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले. तिने एका पोस्टमध्ये मी सिंगल आहे, हा माझा निर्णय आहे असं लिहून चाहत्यांना धक्का दिला होता. याआधी
वर्कफ्रंटसई ताम्हणकर शेवटची गुलकंद या सिनेमात झळकली. याशिवाय ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. तसेच ती अलिकडेच इमरान हाश्मीसोबत ग्राउंड झिरो या सिनेमातही पाहायला मिळाली.