कोविड-१९सारखा वेगाने पसरणारा नाही ‘हंटा व्हायरस’; संक्रमित उंदीर आणि त्यांच्या उत्सर्जनातून होतो संसर्ग, भारतात सध्या समुदाय प्रसाराचा पुरावा नाही.
सध्या कोरोना व्हायरस या आजार नंतर या हंटा व्हायरस ने संपूर्ण देशावर संकट पसरवले आहे, जगात आजच्या काळात मोठ्या प्रमाणात संसर्ग रोग मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर याच रोग विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. याची संपूर्ण माहिती Niv च्या सन संचालकांनी दिली आहे.
अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या एका जहाजावर हंटा व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर जगभरात चिंता व्यक्त होत आहे. या जहाजावर दोन भारतीय नागरिकांनाही संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे भारतातही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या संचालकांनी याबाबत महत्त्वाची माहिती देत नागरिकांना दिलासा दिला आहे.
एनआयव्हीचे संचालक डॉ. नवीनकुमार यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या आपल्या भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठी हंटा व्हायरसमुळे कोणताही मोठा किंवा तातडीचा धोका निर्माण झालेला नाही. त्यांनी सांगितले की, कोविड-१९ प्रमाणे हा विषाणू माणसाकडून माणसाला सहज पसरत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसले तरी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हंटा व्हायरस नेमका काय आहे?
आता या आपल्या माहितीपूर्ण बातमी मध्ये आपण जाणून घेणार आहोत, हा हंटा व्हायरस नेमकं आहे तरी काय, याचे लक्षणे कायबाहेत, हा आजार होतो कशामुळे आणि अजून बरेच काही, जेणे करून तुम्ही या आजार विषयी आणि या आजाराच्या लक्षण विषयी जागृत व्हाल.
हंटा व्हायरस हा प्रामुख्याने उंदरांमधून पसरतो. संक्रमित उंदीर किंवा त्यांच्या लाळ, लघवी आणि विष्ठेच्या संपर्कात आल्यास मानवाला संसर्ग होऊ शकतो. विशेषतः बंद जागा, गोदामे, जहाजे, धान्य साठवणूक केंद्रे किंवा उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या ठिकाणी हा धोका वाढतो.
उंदरांच्या विष्ठेतील किंवा लघवीतील सूक्ष्म कण हवेत मिसळल्यानंतर ते श्वासाद्वारे शरीरात गेल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छता राखणे आणि उंदरांचा बंदोबस्त करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
हा व्हायरस किंवा आजार फारसा धोकादायक नसला तरी देखील या पासून आपल्याला धोका होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी आपण घेणे अत्यंत गरजेचे आहे.
बहुतेक प्रकारांमध्ये हंता व्हायरस माणसामाणसांत सहज पसरत नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घेणे आवश्यक असते. जेव्हा या गोष्टी सुकून हवेत मिसळतात आणि माणूस ती हवा श्वासातून घेतो, तेव्हा संसर्ग होऊ शकतो.
कोविड-१९सारखा हा आजार वेगाने न पसरणारा
डॉ. नवीनकुमार यांनी सांगितले की, हंटा व्हायरसचा प्रसार कोविड-१९ प्रमाणे समुदायामध्ये सहज होत नाही. काही विशिष्ट प्रजातींमध्ये, विशेषतः दक्षिण अमेरिकेतील ‘अँडीज’ प्रकारात, मर्यादित प्रमाणात माणसाकडून माणसाला संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अशा घटना अत्यंत दुर्मिळ आहेत.
त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी नाही. आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी आवाहन केले. अनेक साधारण गोष्टी देखील भयानक रूप धारण करतात कारण त्या पासून होणाऱ्या 5धोक्यापेक्षा त्याची अफवा च जास्त प्रमाणात पसरवली जाते
हंता व्हायरस हा दुर्मिळ आजार असला तरी स्वच्छता आणि काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करता येतो. कोणतीही गंभीर लक्षणे दिसल्यास स्वतः उपचार न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या आजाराची सुरुवात साधारण तापासारखीच होते. सुरुवातीला ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी आणि मळमळ अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेकदा लोक हा साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करतात. परंतु काही दिवसांनी श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा जाणवणे आणि फुफ्फुसांवर परिणाम होणे अशी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. वेळेवर उपचार न घेतल्यास हा आजार जीवघेणाही ठरू शकतो.
या व्हायरससाठी सर्वत्र उपलब्ध अशी विशिष्ट लस किंवा औषध नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय मानला जातो. घराभोवती स्वच्छता ठेवणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, उंदरांचा वावर कमी करणे आणि साफसफाई करताना मास्क व हातमोजे वापरणे यामुळे धोका कमी होतो. विशेषतः धान्य साठवणूक करणारे शेतकरी, गोदामातील कामगार आणि बंद जागा साफ करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
जहाजावरील प्रकरणामुळे वाढली आहे चिंता
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या ‘हॉडियस’ नावाच्या डच जहाजावर हंटा व्हायरसचे अनेक रुग्ण आढळले आहेत. या जहाजावर आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, आणखी काही प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आली आहेत.
आपल्या पर्यंत पोहचलेल्या अहवाल नुसार पहिल्या रुग्णाला सहा एप्रिल रोजी लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. या घटनांमुळे जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देश सतर्क झाले आहेत.
या व्हायरस चा दक्षिण अमेरिकेतील प्रवासाशी संबंध
तपासादरम्यान असे समोर आले की, मृत व्यक्तींनी जहाजावर चढण्यापूर्वी चिली, अर्जेंटिना आणि उरुग्वे या देशांमध्ये पक्षीनिरीक्षण मोहिमेत सहभाग घेतला होता. या भागांमध्ये हंटा व्हायरस वाहून नेणाऱ्या उंदरांचे प्रमाण अधिक असल्याचे मानले जाते.
विशेष बाब सांगायची ती म्हणजे, हंटा व्हायरसचा उबवणी काळ सहा आठवड्यांपर्यंत असू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी रुग्ण हा आढळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. यामुळे संबंधित देशांनी खबरदारीचे उपाय अधिक कडक केले आहेत.
अर्जेंटिनाकडून करण्यात येत आहे मोठी तयारी
अर्जेंटिनाने संभाव्य या व्हायरस विषयी चा धोका लक्षात घेऊन पाच देशांमधील प्रयोगशाळांना सुमारे २,५०० डायग्नोस्टिक किट वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने देखील अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि सिंगापूरसह अनेक देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी आपण घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि अफवांपासून सावध रहावे. आणि आपली व आपल्या परिवाराची तसेच देशाची काळजी घ्यावी.
तथापि, जागतिक स्तरावरही सध्या सार्वजनिक आरोग्यासाठीचा धोका कमी असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. योग्य निरीक्षण, तपासणी आणि स्वच्छता पाळल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
हंटा व्हायरसपासून बचावासाठी घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उंदरांचा वावर असलेल्या जागा नियमित साफ कराव्यात. धूळ किंवा कचरा साफ करताना मास्क आणि हातमोजे वापरणे उपयुक्त ठरू शकते.
तसेच, उंदरांच्या विष्ठेला थेट हात लावणे टाळावे. अन्नपदार्थ झाकून ठेवणे आणि घरात उंदीर शिरू नयेत यासाठी आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. ताप, श्वास घेण्यास त्रास, स्नायूंमध्ये वेदना किंवा थकवा अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.सध्या भारतात हंटा व्हायरसचा समुदाय प्रसार झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याऐवजी जागरूक राहणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा अशी सामान्य लक्षणे दिसतात; परंतु काही वेळा श्वास घेण्यास त्रास होऊन आजार गंभीर होऊ शकतो. हंता व्हायरसपासून बचाव करण्यासाठी घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, उंदरांपासून संरक्षण करणे आणि साफसफाई करताना मास्क व हातमोजे वापरणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून सुरक्षित राहता येते
व्हायरस हा एक दुर्मिळ पण गंभीर विषाणूजन्य आजार आहे. हा आजार मुख्यतः उंदीर आणि घुशींसारख्या कृंतक प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. संक्रमित उंदरांची लघवी, विष्ठा किंवा लाळ यांच्यामुळे हा विषाणू हवेत पसरू शकतो आणि त्या हवेतून श्वास घेतल्यास माणसाला संसर्ग होऊ शकतो. विशेषतः जुनी बंद खोली, गोदाम किंवा धान्य साठवण जागा साफ करताना धोका वाढतो