उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या नैसर्गिक पेयांची मागणी वाढते. अशावेळी प्रत्येक भारतीय घरात सहज मिळणारे आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारे पेय म्हणजे ताक. साधं दिसणारं हे पेय शरीराला केवळ थंडावा देत नाही, तर पचन सुधारण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदे देते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ताक शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते. यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. ताकामध्ये कमी कॅलरीज, भरपूर पाणी, चांगले बॅक्टेरिया आणि शरीरासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यामुळे हे पेय उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी मानले जाते.
उन्हाळा आला की जेवणात आणि असेही ताक घेण्याचे प्रमाण वाढते. ताक पिण्यासही थंड असते आणि शरीरासाठी आतूनही थंड असते. त्यामुळे बहुतांश लोक उन्हाळ्यात ताक पितात. मात्र घरी ताक बनवताना तुम्हीही त्यात मीठ घालता का? तुम्ही असे करत असाल तर वेळीच थांबा.
ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळे अन्न लवकर पचते आणि गॅस, अपचन, ॲसिडिटी यांसारख्या समस्या कमी होतात. आजकाल चुकीची जीवनशैली, तेलकट पदार्थ आणि बाहेरचे अन्न यामुळे अनेकांना पोटाच्या तक्रारी वाढताना दिसतात. अशावेळी रोज योग्य प्रमाणात ताक पिणे फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे ताक हे दह्यापेक्षा हलके असते कारण ताक घुसळताना त्यातील अतिरिक्त लोणी वेगळे केले जाते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ताक हा उत्तम पर्याय मानला जातो.
ताकामध्ये कोणते पोषक घटक असतात?
ताकामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, रिबोफ्लेविन आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीराची ताकद वाढवण्यास मदत करतात आणि शरीराला आतून निरोगी ठेवतात.
अनेक फिटनेस तज्ज्ञांच्या मते, ताक शरीराला हायड्रेट ठेवते आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जेव्हा शरीर योग्य प्रकारे हायड्रेट राहते तेव्हा अनावश्यक खाण्याची सवय कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील महत्त्वाचे क्षार कमी होतात. ताकामध्ये असलेले पोटॅशियम आणि कॅल्शियम हे क्षार पुन्हा शरीरात संतुलित करण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटते.
ताक अधिक गुणकारी बनवण्यासाठी त्यामध्ये काही घरगुती पदार्थ मिसळले जातात. योग्य मिश्रणामुळे ताकाचे फायदे अनेक पटींनी वाढतात. सर्वात लोकप्रिय मिश्रण म्हणजे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि काळे मीठ. जिरे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, तर काळे मीठ गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी करते. उन्हाळ्यात जेवणानंतर असे ताक घेतल्यास पोट हलके वाटते.
आल्याचा रस किंवा आले पेस्ट ताकात घातल्यास मळमळ, अपचन आणि जडपणा कमी होतो. कढीपत्ता मिसळल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते. पुदिन्याची पाने ताकाला नैसर्गिक थंडावा देतात आणि पोटातील जळजळ कमी करतात. ज्यांना ताकामुळे गॅस होण्याची समस्या जाणवते त्यांनी त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकावे. त्यामुळे पचन अधिक सुलभ होते.
ताक पिण्याची योग्य वेळ कोणती आहे?
ताक पिण्याची योग्य वेळ जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुपारी जेवणासोबत किंवा जेवणानंतर ताक पिणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे अन्न लवकर पचते आणि दुपारच्या उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होते. काही लोक सकाळी रिकाम्या पोटी ताक पितात. यामुळे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होऊ शकते, मात्र काहींना यामुळे थंडी वाजणे किंवा कफ वाढण्याचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीरप्रकृतीनुसार ताकाचे सेवन करणे आवश्यक आहे.
रात्री ताक पिणे अनेकांसाठी योग्य मानले जात नाही. कारण रात्री शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते. अशावेळी थंड प्रकृतीचे ताक घेतल्यास कफ, सर्दी किंवा सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. विशेषतः वातविकार किंवा संधिवात असलेल्या लोकांनी आंबट ताक टाळावे. आंबट ताकामुळे शरीरातील वेदना वाढण्याची शक्यता असते.
काही लोकांनी ताक पिताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना किडनीचे गंभीर आजार आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त ताक पिऊ नये. कारण ताकामध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते. तसेच ज्यांना लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणजेच दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांना ताकामुळे पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात. ताप, सर्दी किंवा खोकला असताना ताक टाळणे चांगले मानले जाते.
घरच्या घरी बनवलेले ताजे ताक हे नेहमीच अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. बाजारातील जास्त मसालेदार किंवा प्रिझर्व्हेटिव्ह असलेले ताक टाळावे. ताक बनवताना ताजे दही, स्वच्छ पाणी आणि नैसर्गिक मसाले वापरल्यास त्याचे फायदे अधिक मिळतात. दिवसातून एक ग्लास ताक शरीरासाठी पुरेसे मानले जाते.
ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या और्ण माहिती –
1. पचनक्रिया सुधारते- ताक पिण्याचा फायदा
ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात. हे चांगले बॅक्टेरिया पोट निरोगी ठेवतात आणि अन्न पचण्यास मदत करतात. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात.
2. शरीराला मिळतो थंडावा
उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढते. अशावेळी थंड ताक पिल्याने शरीराला ताजेपणा मिळतो आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
3. हाडे मजबूत होतात- ताक पिण्याचे फायदे
ताकात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात. नियमित ताक पिणाऱ्यांची हाडे अधिक मजबूत राहतात. हा ताक पिण्याचा सर्वात महत्वाचा असा फायदा आहे.
4. शरीराला मिळते ऊर्जा देण्याचे काम ताक करते
ताक हे हलके आणि पौष्टिक पेय आहे. ते शरीराला पटकन ऊर्जा देते. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ताक उपयुक्त ठरते.
5. वजन नियंत्रणात ठेवण्यास ताक मदत करते
ताकामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ताक हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
न्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची गरज वाढते. अशावेळी घराघरात आवडीने प्यायले जाणारे एक पारंपरिक आणि आरोग्यदायी पेय म्हणजे ताक. दह्यापासून बनणारे ताक केवळ तहान भागवत नाही, तर शरीराला अनेक पोषक घटकही देते. आजच्या धावपळीच्या जीवनातही ताक हे आरोग्यासाठी एक नैसर्गिक औषध मानले जाते.
हे सर्व फायदे आपल्याला ताक पिल्याने मिळतात त्यामुळे आपण या दिवसात नक्की ताक प्यावे.
ताकात मीठ टाकून पिणे का टाळावे?
पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांच्या मते, ताकात मीठ मिसळून पिणे आरोग्यासाठी योग्य नाही. ताकामध्ये असलेले हेल्दी बॅक्टेरिया शरीरासाठी फायदेशीर असतात. पण त्यात जास्त मीठ घातल्यास या प्रोबायोटिक्सचा प्रभाव कमी होऊ शकतो. याचा थेट परिणाम पोटाच्या आरोग्यावर होतो.
त्यामुळे ताक अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी मीठाऐवजी जिरेपूड, कोथिंबीर, पुदिना किंवा थोडे भाजलेले जिरे वापरणे अधिक फायदेशीर ठरते. मीठ आणि ताक मिक्स ज्करून पिण्या येवजी नुसत्रे ताक पिणे कधी ही फायदेशीर आहे.
ताक हे आपल्या भारतीय संस्कृतीतील एक साधे पण अतिशय गुणकारी पेय आहे. नियमित प्रमाणात ताक पिल्याने पचन सुधारते, शरीराला थंडावा मिळतो आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. मात्र ताकात जास्त मीठ टाकणे टाळावे. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले ताक हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम आरोग्यदायी पेय ठरू शकते.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, पचन सुधारवणारे आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करणारे ताक हे खरोखरच एक नैसर्गिक सुपर ड्रिंक आहे. मात्र कोणतेही पदार्थ प्रमाणात आणि योग्य वेळी घेतल्यासच त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या शरीरप्रकृतीनुसार आणि आरोग्याच्या स्थितीनुसार ताकाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.
ताकात लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया असतात, जे संसर्ग आणि रोगांना रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिसाद वाढवतात असे दिसून आले आहे. ताकाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास आणि सर्दी आणि फ्लू सारख्या सामान्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.