पुणे स्टेशन परिसरात घडली घटना; हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर शस्त्राने केला वार

पुणे: पुणे स्टेशन परिसरात घडली घटना; हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर शस्त्राने केला वारपुणे स्टेशन परिसरात घडला प्रकार. हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन शिवाजी माने (३०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लंब्या नाव असलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माने यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने आणि आरोपी लंब्या दोघेही पुणे स्टेशन परिसरात राहायला आहे. ते किरकोळ कामे करतात. दोघेजण मजुरी करण्यासाठी पुण्यात आले होते. माने याने आरोपीला ४०० रुपये उसने दिले होते. शुक्रवारी (दि. २७) रात्री माने याने आरोपीला ४०० रुपये मागितले.

या कारणावरून माने आणि आरोपींमध्ये वाद झाला. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल ऑफिसजवळ आरोपीने माने याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. माने गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार पुढील तपास करत आहेत.

हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन शिवाजी माने (३०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लंब्या नाव असलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माने यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top