पावसाळ्यात ताप आला! सावधान डेंग्यू आला! कशामुळे होतो संसर्ग? जाणून घ्या लक्षणं, कारणं आणि उपाय!

पावसाळ्यात ताप आला! सावधान डेंग्यू आला! कशामुळे होतो संसर्ग? जाणून घ्या लक्षणं, कारणं आणि उपाय!

dengue infection during monsoon : डेंग्यू पावसाळा आला कि उद्रेक ठरलेलाच.. डेंग्यूशी लढा हा दर पावसाळ्यात दरवर्षी आव्हानात्मकच अशतो. सातत्याने डेंग्यु रुग्णांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे काही अंशी मृत्यू सुद्धा संभवतो. जगामध्ये जवळपास पाच कोटी लोकांना या रोगाचा संसर्ग होतो. भारतातही या आजाराचे शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

डेंग्यू विषाणूजन्य रोग (अरबो व्हायरस) आहे. डेंग्यु विषाणूचे डेंग्यु स्टेज – 1, डेंग्यु स्टेज – 2, डेंग्यु स्टेज – 3, डेंग्यु स्टेज – 4 असे चार प्रकार आहेत. आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील बर्‍याच आणि शहरातही डेंग्यूचा अनेकांना पावसाळ्यात संसर्ग होतो. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनातर्फे डेंग्यूसंदर्भात दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा हिवताप अधिकारी आर. बी.ढोले यांनी काही आवश्यक उपाययोजनाही सांगितल्या आहेत. डेंग्यूची साथ पावसाळ्यात जास्त प्रमाणात येते. आज आपण डेंग्यूची लक्षणे, उपचार आणि खबरदारी यासंदर्भात माहिती जाणून घेऊया.

डेंग्यूचा प्रसार कसा होतो

डेंगयू या रोगाचा प्रसार दुषित एडीस इजिप्ती नावाची मादी डास चावल्यामुळे निरोगी व्यक्तीला डेंग्युचा संसर्ग होतो. डेंग्यु विषाणुयुक्त डास मरेपर्यंत दुषित राहून अनेक व्यक्तीना चावून या रोगाचा प्रसार करतो. डासाच्या शरीरात डेंग्यु विषाणुची वाढ साधरणत: ८ ते १० दिवसांत पूर्ण होते. या रोगाचे प्रसारक एडिस इजिप्ती डास साठविलेल्या स्वच्छ पाण्यांत उदा. रांजण माठ, कुलर्स, पाण्याचे हौद, घराच्या छतावरील टाकाऊ वस्तु, नारळाच्या कुरवंट्या, टायर इ. मध्ये पैदा होतात. हे डास दिवसा चावतात. या डासांच्या पायांवर काळे पांढरे रिंग असतात. म्हणून या डासांना टायगर मॉस्क्‌युटो सुद्धा म्हणतात.

अंदाजा किती दिवस पर्यंत जगतो डेंग्यूचा डास?

एडिस इजिप्ती डासाची वाढ चार प्रकारामध्ये होते. उदा. अंडी, अळी, कोष हा डास ५ ते १० दिवस जगतो.

डेंग्यु आजाराची लक्षणे काय आहेत ?

डेंग्यु ताप –

  • एकाएकी तीव्रताप
  • तीव्र डोके दुखी
  • स्नायुदुखी
  • सांधेदुखी
  • उलट्या होणे
  • दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोळे दुखी
  • अशक्तपणा भूक मंदावणे
  • ताप कमी जास्त होणे
  • अंगावर पुरळ येणे

डेंग्यु ताप जो रक्तस्त्रावयुक्त असतो

  1. डेंग्यु तापाची वरीलप्रमाणे लक्षणे आढळून येतात.

2. त्वचेखाली रक्तस्त्राव होणे.

3. नाकातून रक्तस्त्राव होणे.

4. रक्ताची उलटी होणे.

5. रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे.

6. रक्तस्त्रावयुक्त डेंग्युताप बहुतांशी १५ वर्षाखालील मुलांना होतो.

7. मोठ्या व्यक्तींनाही होऊ शकतो.

डेंग्यु शॉक सिंड्रोम काय आहे?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डेंग्यु मध्ये जेव्हा रुग्ण बेशुद्ध होतो त्याला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

काय आहेत उपचार?

  • या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत.
  • वैद्यकीय अधिकारीऱ्यांच्या सल्लानुसार वेदनाशामक औषधे व विश्रांती घेणे आवश्यक आहे.
  • अतिशय घाम येणे
  • वारंवार उलट्या होणे
  • जिभेला कोरड पडणे अशा परिस्थितीत ओ.आर.एस. (मीठ साखर पाणी) द्रावणाचे सेवन करावे.

लक्षात ठेवा, या गोष्टींची दक्षता घ्या..

  1. टॅब ॲस्परीन, ब्रुफेन ई औषधी देऊ नयेत.

2. वैद्यकीय अधिकारी यांच्या देखेरेखीखाली औषधोपचार घेणे.

3. रक्तस्त्रायुक्त डेंग्युताप (डेंग्यु हिमोरेजिक फिवर) व डेंग्यु शॉक सिंड्रोम या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना काय?

हा रोग पसरणे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो –

डास अळी व डास प्रतिबंध :- 

डास अळी नियंत्रण ही सर्वात महत्वाची कृती आहे. हिवताप, डेंग्यु व चिकनगुनिया चे डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात.

डासोत्पती होणारी परिस्थिति आणि स्थान नाहीसे करणे :- 

पावसाळ्यात साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या इत्यादी

कमी पाणी साचवता दिवस काढावा :- 

डासोत्पती स्थाने नष्ट करण्यासाठी आठवड्यातून एकादा पाणी साठे रिकामे करुन कोरउा दिवस पाळण्यात यावा.
साचलेली डबके व नाल्या वाहत्या कराव्यात. खड्डे बुजविण्यांत यावेत. शक्य नसल्यास या पाण्यावर आठवड्यातून एकदा रॉकेल, टाकाऊ ऑईल टाकण्यात यावे.

जैविक उपाय योजना :- 

डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्यात येतात. हे मासे डासांच्या अळ्या खातात. सर्व आरोग्य संस्थेत गप्पी मासे मोफत मिळतात.

औषध आणि धुर फवारणी करणे :- 

उद्रेकग्रस्त भागात धुर फवारणी केली जाते. आठवड्याच्या अंतराने दोनदा केली जाते.

डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *