दीपा मुधोळ यांच्याकडे पुण्यात महत्त्वाची जबाबदारी; राज्यात 20 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दीपा मुधोळ यांच्याकडे पुण्यात महत्त्वाची जबाबदारी; राज्यात 20 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील प्रशासकीय यंत्रणेतील हालचाली पुन्हा एकदा गतीमान झाल्या आहेत. महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या करत प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यातील 20 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या आणि पदोन्नतीने प्रशासनाचा चेहरामोहरा काहीसा बदलला आहे. यात दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु असून, यावेळी देखील अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांचा उद्देश प्रशासनात गती आणणे, विकासकामांना चालना देणे आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे असा मानला जात आहे.

दीपा मुधोळ यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती

दीपा मुधोळ-मुंडे (IAS: RR: 2011) या सध्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या. त्यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण विभागात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बदल्या पुढीलप्रमाणे:

  1. एम.एम. सूर्यवंशी (IAS: SCS: 2010) – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. आता त्यांची नियुक्ती वसई-विरार महानगरपालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
  2. नीलेश गटणे (IAS: SCS: 2012) – पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आता ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुंबईत कार्यभार सांभाळतील.
  3. ज्ञानेश्वर खिलारी (IAS: SCS: 2013) – बहुजन कल्याण विभागात संचालक होते. आता त्यांची नियुक्ती अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त व भूमी अभिलेख संचालक (पुणे) म्हणून झाली आहे.
  4. अनिलकुमार पवार (IAS: SCS: 2014) – पूर्वी वसई-विरार महानगरपालिकेत आयुक्त पदावर होते. आता ते MMR SRA, ठाणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
  5. सतीशकुमार खडके (IAS: SCS: 2014) – आपत्ती व्यवस्थापन संचालक पदावर होते. आता ते पुणेतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले आहेत.
  6. भालचंद्र चव्हाण (IAS: नॉन-SCS: 2019) – भू-सर्वेक्षण विकास संस्थेचे आयुक्त होते. आता त्यांना आपत्ती व्यवस्थापन संचालक, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  7. सिद्धार्थ शुक्ला (IAS: RR: 2023) – यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी, गोडपिंपरी उपविभाग येथे करण्यात आली आहे. ही नियुक्ती पूर्वीच्या आदेशात सुधारणा करून केली आहे.
  8. श्री अनिलकुमार पवार (IAS:SCS: 2014) महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, MMRSRA ठाणे इथं नियुक्त करण्यात आली आहे.
  9. श्री. विजयसिंह शंकरराव देशमुख (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त आयुक्त-2, छत्रपती संभाजी नगर विभाग यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  10. श्री. विजय सहदेवराव भाकरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती,  भंडारा यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  11. श्री.त्रिगुण शामराव कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त महासंचालक, MEDA, पुणे यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  12. श्री. गजानन धोंडीराम पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  13. श्री. पंकज संतोष देवरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती लातूर यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  14. श्री. महेश भास्करराव पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस म्हणून पदोन्नती) अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) पुणे विभाग यांची  आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे इथं आयुक्त, म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
  15. श्रीमती मंजिरी मधुसूदन मानोलकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, आयएएस म्हणून बढती) सहआयुक्त, (पुनर्वसन), नाशिक विभाग,नाशिक यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  16. श्रीमती. आशा अफझल खान पठाण (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांची सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपुर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  17. श्रीमती राजलक्ष्मी सफिक शाह (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त विभागीय आयुक्त (जनरल), कोकण विभाग, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  18. श्रीमती सोनाली नीळकंठ मुळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, अमरावती यांची संचालक, OBC, बहुजन कल्याण, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  19. श्री.गजेंद्र चिमंतराव बावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, बुलढाणा यांची आयुक्त, भू सर्वेक्षण विकास संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  20. श्रीमती प्रतिभा समाधान इंगळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती,सांगली यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासनात नवचैतन्याची तयारी

या बदल्यांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत आणि महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांमध्ये नव्या नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रशासनाच्या कामकाजात गती येणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आणि जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट यामुळे साध्य होईल अशी अपेक्षा आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अनेक नव्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची संधी मिळाल्याने प्रशासनात ताजेपणा आणि ऊर्जा निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. आगामी काळात या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *