आषाढी वारी/ Pandharpur Wari:
सर्वांच्या मनात भक्तीची ज्योत तेवत ठेवणार्या पंढरी रायाची म्हणजेच विठ्ठालाची वारी ही कितीही ऊन वारा पाऊस असला तरी दरवर्षी होतेच. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि त्याचबरोबर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आज लाखो वारकरी वारीसाठी दरवर्षी पायी जात आहेत हे आपण दरवर्षी पाहतोच.
हे सर्व शक्य आहे कारण पांढुरंगावरची भक्ति ही सर्व वारकर्यांच्या मनात अखंड जागृत आणि प्रभावीपणे तेवत असते. भक्ती विषयी सांगायचे झाल्यास, आपल्याला माहितच आहे की, तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आज लाखो वारकरी वारीसाठी दरवर्षी पायी जात आहेत.
या वारी विषयी सांगण्यापेक्षा आपण स्वतःच पाहतो, किती शिस्तबद्धपणा दिसून येतो वारकर्यांच्या वारी सोहळ्यात, तो महिमा शब्दात वर्णन करणे अगदी अशक्यच. रस्त्यात वारकऱ्यांची शिस्त, विठ्ठलाच्या प्रति त्यांचा निष्काम भाव, ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करत विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ हे सर्व पाहणेही अत्यंत पुण्यशील कर्म समजले जाते. असा हा वारकरी मात्र ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक असतो.
या सामान्य वारकऱ्यांच्या चित्तशुद्धीचा निष्काम कर्माचा विज्ञाननिष्ठ प्रयोग संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या मार्गे जनतेला दिला आहे व त्याचा आता आषाढी एकादशीनिमित्ताने आध्यात्मिक उत्सव सुरू आहे.
भक्तीचे बहुरूप आणि स्वरूप

देवाचे स्मरण, नामसंकीर्तन, श्रवण, नामोच्चार, अहंकारनिरसन, मनीमानसीपूजन, दास्यभाव, आत्मसमर्पण, सख्यभाव अशी ही नवलक्षणांनी युक्त असलेली भक्ती म्हणजे नवविधा भक्ती होय. हाच भक्तियोग वारीत साधला जातो.
नवविधा भक्ती जो जाणतो आणि साक्षात ह्या नवलक्षणांनी युक्त अशी भक्ती करतो, तोच खरा भक्त आणि देव होय. भक्तीचा भौतिक प्रभाव मांडतानाही तुकोबा विज्ञानाचा आधार घेऊन, भक्तिमार्ग हा पूर्णपणे वैज्ञानिक असल्याचे सांगतात.
भक्ती विषयी आणखी सांगायचे झाल्यास, आपण वाचलेच असेल ‘नाम घेता कंठ शीतळ शरीर। इंद्रिया व्यापार नाठवती।।’ भक्ती हे सोपे कर्म असल्याचे सांगतात. परंतु, लगेच तुकोबा भक्ती ही अत्यंत कठीण अशी शुळावरची पोळी असल्याचेही प्रतिपादन करतात.
भक्तीसाठी मनाचा कठोर निर्धार आवश्यक असतो आणि सर्व विकार विकृतींचाही त्याग करावा लागतो. शुद्ध अंतःकरणानेच भक्तीच्या समाधीकडे प्रवास करणे शक्य असते.
भक्ती आणि कर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू
तुकोबांनी सर्वांनाच भक्तीचा अधिकार असल्याची घोषणा केली. ‘सकळांसी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे।।’ असे भक्तीचे स्वरूपही आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. तुकोबांनी केवळ भक्तीचाच डांगोरा पिटला आणि कर्माला दांडी मारली असे नाही.
तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. भक्ती ही अज्ञातवासात किंवा एकांतात किंवा डोंगरदऱ्यात किंवा देवळातच केली पाहिजे, हे आवश्यक नाही.
कर्म करताना कोणत्याही स्थळीकाळी भक्ती करता येते. भक्तीमुळे निष्काम कर्मही करता येते. माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध झाल्या की कर्म हे कर्तव्य म्हणून करणे शक्य होते. कर्माला कर्तव्य मानले की कर्माच्या फलाची आशाही सुटते आणि फलाची चिंताही मिटते.
भक्तीचा संबंध हा मनुष्याच्या मनोपिंडाशी असतो. भक्तीच्या माध्यमाने भक्त हा देवरूप होतो. अशीच माणसे समाजाच्याही उद्धाराचे काम करतात. भक्तीची प्रक्रिया ही विज्ञाननिष्ठ प्रक्रिया असून, समाजाच्या चित्तशुद्धीचा इहवादी कार्यक्रम म्हणून तुकोबांनी भक्तिमार्ग समाजासमोर मांडला होता.
स्वतःच्या अनुभवाने तुकोबांनी तो सिद्धही केला. भक्तीचा आणि मनाचा संबंध असतो म्हणून मनावर भाष्य करताना तुकोबा म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।।’
भक्तीचे स्वरूप
तुकोबांनी नवविधा भक्तीचेही स्वरूप स्पष्ट केलेले आहे. पूर्वसुरींच्या संतांनीही नवविधा भक्तियोगाचे प्रतिपादन केले होते. ज्याला नवविधा भक्ती करता येते त्याचेच अंतःकरण शुद्ध होते. नवविधा भक्तीयोग पूर्णपणे व्यावहारिक पातळीवर आणण्याचे श्रेय मात्र, तुकोबांनाच दिले पाहिजे.
ज्याचे नामस्मरणात चित्त जडलेले आहे अशाच लोकांचे अंकित व्हावे, दास व्हावे, असे तुकोबांना वाटते. चित्तवृत्ती प्रसन्न आणि आनंदित होतात. जीवनातले परमोच्च असे भक्तिसुखही त्याला प्राप्त होते.
संतांनी अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितले
संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. ‘नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा’ ही संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.
संटण परंपरा म्हणजे दिंडी
संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. तीच संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.
वारी हा एक अंतःकरण आणि मन नाविन्यपूर्ण करण्याचा मार्ग
आपल्या रोजच्या तसेच वार्षिक व्याप आणि ताण यांच्यापासून मुक्त आणि मानसिक रूपात पुनर्जीवित होण्याचा मार्ग म्हणजे वारी. संतांचा विचार हा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ आणि सर्वधर्मसमभावात्मक मानवतावादी विचार आहे. सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेच्या जगण्याचे मौलिक तत्त्वज्ञान आहे. वारी मुळे जगातील सर्वच नकारात्मक आणि दहशतवादी विचारांना आळा बसतो, आणि सर्वांच्या मनात आनंदी आणि प्रसन्न भाव निर्माण होतात.
दिंडी आणि वारी म्हणजे जणू काही विश्वशांती तसेच एकोप्याचे कार्य
दिंड्यांमधील पायी चालणारे वारकरी वाखरी तळावर पोहोचले की, त्यांना विसावा हवा असतो. म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी वाखरी येथे अत्यंत सुंदर ‘विश्वशांती गुरूकुल’ स्थापन केले. वारकऱ्यांसाठी २०० स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली. जवळ जवळ एक लाख वारकऱ्यांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येते. या दिंडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिंडी प्रमुखाचे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन येणाऱ्या महिला वारकऱ्यांचा शाल, पुष्पहार देऊन थाटामाटात स्वागत हाेते. सर्वच वारकरी एकसारखे दिसतात आमि त्यांच्या चेहर्यावर आनंद, समाधान आणि विश्वशांती असल्याचे भाव दिसत असतात.
तर असा आहे या वारीचा महिमा. जो सर्व वारकरी आणि वारकरी संप्रदाय अखंडपणे वर्षानुवर्षे चालूच आहे, आणि चालूच राहणार.