Apple Layoff 2025: विक्रमी कमाईनंतरही ॲपलमध्ये नोकरकपात; सेल्स टीमवर गंडांतर का?

जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा सिलसिला 2025 मध्येही सुरूच आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपल (Apple Inc.) नेही कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय घेतला असून, विशेष म्हणजे विक्रमी महसूल (Record Revenue) मिळूनही कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

सेल्स डिव्हिजनमध्ये पुनर्रचनाब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ॲपलच्या प्रवक्त्याने या नोकरकपातीची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले की, ग्राहकांशी अधिक प्रभावीपणे संपर्क साधण्यासाठी सेल्स डिपार्टमेंटची पुनर्रचना केली जात आहे. कामावरून कमी झालेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीतच नवीन पदांसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक परिणाम

अहवालानुसार, काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुमारे 20 पदे रद्द करण्यात आली. डझनभर सेल्स कर्मचारी यामुळे प्रभावित झाले आहेत. शाळा, सरकारी संस्था आणि मोठ्या व्यवसायांसोबत काम करणारे खाते व्यवस्थापक (Account Managers) आणि ब्रिफिंग सेंटर कर्मचारी यांच्यावर सर्वाधिक परिणाम झाला.

20-30 वर्षे काम केलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांवरही परिणाम

कंपनीतील अनेक ज्येष्ठ कर्मचारी, जे 20 ते 30 वर्षांपासून ॲपलसोबत काम करत होते, त्यांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत.असेही सांगितले जाते की, सरकारी एजन्सींसोबत काम करणाऱ्या सेल्स टीमवर अमेरिकन सरकारच्या शटडाऊनचा परिणाम झाला.

बंपर कमाई असूनही नोकरकपात का?

Apple Inc. ने अलीकडेच विक्रम महसूल (Record Revenue) जाहीर केला आहे. डिसेंबर तिमाहीचा महसूल सुमारे $140 अब्ज असण्याची अपेक्षा आहे.

नवीन iPhone आणि इतर प्रॉडक्ट्सच्या दमदार विक्रीमुळे कमाई उच्चांकी स्तरावर आहे.तरीही, ऑपरेशनल खर्च कमी करणे, सेल्स स्ट्रक्चर अधिक कार्यक्षम बनवणे आणि बाजारातील अनिश्चित स्थिती ही नोकरकपातीची मुख्य कारणे असल्याचे विश्लेषणकर्त्यांचे मत आहे.

या कंपनी मध्ये झालेल्या या नोकरकपातीने जागतिक टेक इंडस्ट्रीतील दबाव आणि अनिश्चितता पुन्हा अधोरेखित केली आहे. एका बाजूला कमाईचा उच्चांक गाठताना दुसऱ्या बाजूला कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय अनेकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top