Lucky Zodiac Signs : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 7 जुलैचा दिवस काही राशींसाठी फार शुभ असणार आहे. नुकतीच आषाढी एकादशी झाली आहे. सगळे वारकरी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. अशातच आषाढी एकादशीनंतरचा दिवस म्हणजेच 7 जुलैचा दिवस काही राशींसाठी फार शुभ असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा ज्या राशीवर सर्वात जास्त प्रभाव असतो त्या राशींसाठी तो दिवस खास असतो.
7 जुलै दिवशी ‘या’ 5 राशींना लागणार लॉटरी!
तर या 5 राशी आहेत –
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार खास आहे. तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमचा सकारात्मक दृष्टीकोण राहील. तसेच, काही कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करावा लागेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी उद्याचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमचं मनोबल वाढेल. तुम्ही उद्यापासून नवीन कार्याची देखील सुरुवात करु शकता. सामाजिक स्थैर्य लाभेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक चांगला असेल. तुम्हाला कोणताच मानसिक ताण जाणवणार नाही. तसेच, समाजातील काही खास व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. नातेसंबंध मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी उद्याचा दिवस फार अनुकूल असणार आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तसेच, कामाच्या काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमचं मन फार प्रसन्न असेल. संध्याकाळी तुम्ही धार्मिक कार्यात मग्न व्हाल. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग खुले होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वातावरण मिळेल. तसेच,तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्र परिवाराशी भेटीगाठी वाढतील.