सर्वांसाठी भूमी अभिलेख विभागाणे, एक क्रांतिकारी आणि आधुनिक उपक्रम योजला आहे. तुमच्या जमिनीची सर्व कागदपत्रे तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत. जसे की, शेतकऱ्यांसाठी सातबारा हे दस्ताऐवज खूप महत्वाचे असते वेळोवेळी हे कागदपत्र लागत असल्याने अनेकदा ऑनलाईन सेंटरवर रांगेत उभे राहून घ्यावे लागते. भूमी अभिलेख विभागाने आता सातबारा असो कि आठ अ किंवा जमिनीचे इतर कागदपत्रे, हि सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
जमिनीची कागदपत्रे जसे कि सातबारा, एकूण जमिनीचा दाखला आणि इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेंटरमध्ये जावे लागते. यामध्ये नागरिकांचा वेळ तसेच पैसे देखील वाया जातात.
परंतु भूमी अभिलेख विभागणे हे सर्व ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सॲप मोबाईलवर हि सर्व कागदपत्रे मिळणार आहेत व्हाट्स अप्प वर सात बारा सहित. यामुळे शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबणार असून वेळेची व पर्यायाने पैशांची देखील मोठी बचत होणार आहे.
शेतकऱ्यांना काय होणार फायदा? जमिनीची कागदपत्रे व्हॉट्सॲपवर मिळाल्याने

भूमी अभिलेख विभागाच्या या आधुनिक धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचे महत्वाचे दस्ताऐवज अगदी आरामात मोबाईलवर मिळणार असल्याने तालुक्याच्या ठिकाणी होणारी त्यांची पायपीट आणि हेरफाटे हे बंद होणार आहे.
तसेच याचा आणखी एक फायदा म्हणजे काही महा इ सेवा केंद्रावर सातबारा किंवा जमिनीचा दाखला घेण्यासाठी एका कागदपत्रासाठी ३० ते ४० रुपये शुल्क आकारले जातात. हेच कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने केवळ १५ रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाभूमी अभिलेख विभाग Whatsapp सातबारा हि सेवा ऑगस्ट २०२५ पासून सुरु करणार आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या सुविधा बद्दल पाहूया थोडक्यात माहिती
नोंदणी केल्यानंतर युजर आणि पासवर्ड टाकून लॉगीन करावे लागेल आणि त्यानंतर योजनेचा लाभ घेता येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी अभिलेख या पोर्टलवर अगोदर नोंदणी करावी लागणार आहे.
सुविधेचे नाव | व्हॉट्सॲपवर जमिनीचे कागदपत्रे पुरवठा करणे |
विभागाचे नाव | भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | शेतकरी व जमीन असणारे नागरिक. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | website link |
योजना प्रारंभ | एक ऑगस्टपासून सुरु होणार अंमलबजावणी |
महाभूमी अभिलेख या शासनाच्या वेबसाईटवर जावून अगदी १५ रुपयांमध्ये सातबारा किंवा जमिनीचा एकूण दाखला मिळतो. हा डिजिटल सातबारा सर्केव शासकीय कामांसाठी ग्राह्य धरला जातो.