एका बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटीनं श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली आहे. यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. जाऊन घेऊयात या विषयी अधिक माहिती
Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) अनेक भक्त आहेत. सिनेसृष्टीतही श्री स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कित्येकदा बोलताना किंवा मुलाखतींमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे किंवा समर्थांच्या दृष्टांतांचे अनेक किस्से ऐकवले आहेत.
बरेच सिने सेलिब्रिटी मोठ्या भक्तीभावानं श्री स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करतात. तसेच, अनेकजण तर सेटवर मोकळ्या वेळात किंवा अडीनडीच्या वेळी श्री समर्थांचा धावा करतात असंही अनेकांनी सांगितलं आहे. अशातच आता एका बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटीनं श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली आहे. यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.

तर तो सेलिब्रिटी आहे, जब वी मेट’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता शाम मशाळकरच्या (Sham Mashalkar) घरी श्री समर्थांच्या पादुकांचं आगमन झालेलं. अभिनेत्यानं मनोभावे स्वामींच्या पादुका घरी आणल्या आणि त्यांची सप्त्नीक मनोभावे पूजा अर्चा करुन आदरातिथ्य केलं. यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मिडिया हँडलवर पोस्टही केली आहे. तसेच, एक व्हिडीओही शेअर केला आहे.
अभिनेत्यानं इन्स्टापोस्टमध्ये काय म्हटलंय? पाहूया –
“आमच्या घरी काल तिन्हीसांजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका गुरुमंदिर (श्री बाळप्पा मठ) अक्कलकोट यांचे पुजन झाल्यानं प्रसन्न वाटलं. स्वामींची कृपा”, असं कॅप्शन त्यानं या पोस्टला दिलं आहे. या पूजेत त्यांच्या कुटुंबीयांनी भाग घेतला होता. शामच्या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

श्री समर्थांच्या पादुका काही भक्तमंडळींच्या घरी पूजाअर्चेसाठी नेल्या जात असतात. स्वामींच्या पादुका घरी आणल्यानंतर भक्तांकडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. तसेच, त्यांना दुग्धाभिषेक घालून नैवेद्य दाखवला जातो. अशाच स्वामींच्या पादुका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी नेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्यानं पादुकांची मनोभावे पूजा केली.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाम मशाळकरनं अनेक सुपरहिट मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘क्या लव्हस्टोरी है’, ‘पानीपत’, ‘हाऊसफुल 4’, ‘युवराज’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्यानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.