लहानपणीचं स्वप्न पुर्ण केले आणि बनला बुद्धिबळातला राजा- डी. गुकेश ठरला चेस मास्टर

लहानपणीचं स्वप्न पुर्ण केले आणि बनला बुद्धिबळातला राजा- डी. गुकेश ठरला चेस मास्टर

D Gukesh :डी गुकेश याने इतिहास रचला आहे. डी गुकेश याने बुद्धिबळातल्या महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला ‘चेक मेट’ केले आहे.

डी गुकेश ने आपले लहानपणीचं स्वप्न पूर्ण केले आणि बनला बुद्धिबळातला राजा

क्रीडा क्षेत्रातून या क्षणाची सर्वात मोठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. भारताच्या डी गुकेश याने इतिहास घडवला आहे. डी गुकेश बुद्धिबळाच्या खेळतला नवा किंग ठरला आहे. डी गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला आहे. डी गुकेश यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे.

D Gukesh Youngest World Chess Champion
D Gukesh Youngest World Chess Champion

डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळाच्या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली आहे. डी गुकेशने 14 डावांनंतर साडे सात आणि साडे सहा अशा फरकाने डिंग लिरेन याचा पराभव केला आणि वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. डी गुकेशचं या ऐतिहासिक कामगिरीनंतर सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.

तमिळनाडू चे मुख्यमंत्री एम.के. स्ट्यलीन म्हणतात :-

सचिन तेंडुलकर ने डी. गुकेश ला मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा देताना विडियो शेअर केला आहे.

युवा विश्वविजेता

डी गुकेश याने या विजयासह अनेक विक्रम रचले आहेत. गुकेश वर्ल्ड चॅम्पियन होणारा सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. तसेच 12 वर्षांनंतर भारताला नवा चॅम्पियन मिळाला आहे. डी गुकेश च्या आधी 2012 साली विश्वनाथन आनंद चेस मास्टर ठरले होते.

डी गुकेश याचा परिचय

वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. डी गुकेशचे आई आणि वडील दोघेही उच्चशिक्षित आहेत. डी गुकेशची आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. तर वडील डॉक्टर आहेत. मात्र गुकेशला आई-वडीलांपेक्षा वेगळी आवड होती ती म्हणजे बुद्धिबळाची. डी गुकेशने वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. गुकेशने त्यानंतर आता अवघ्या 11 वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आणि भारताचं नावं जगभरात उंचावलं आहे. डी गुकेशने या दरम्यान अनेकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

D Gukesh Youngest World Chess Champion
D Gukesh Youngest World Chess Champion

डी गुकेश याने विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीतून चेजची बारकावे शिकले. २०१२ चा विश्वविजेता राहिलेल्या विश्वनाथन आनंदने  गुकेशला चेज या खेळातील चे बारकावे शिकवले. गुकेशने वर्ल्ड चॅम्पियन होण्याआधी अनेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. गुकेशने सरावानंतरच्या 5 व्या वर्षी म्हणजेच 12 व्या वर्षी धमाका केला. गुकेश भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला. इतकंच नाही, तर गुकेशने 2023 मध्ये वर्ल्ड रँकिंगमधील पहिलं स्थान पटकावत एक नंबर कामगिरी केली. तसेच याच वर्षी म्हणजे काही महिन्यांपूर्वी मार्चमध्ये गुकेशने “वर्ल्ड चेस कॅण्डीडेट” स्पर्धेत बाजी मारली. गुकेश याने या विजयासह वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलसाठी क्वालिफाय केलं. त्यानंतर आता गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे.

One thought on “लहानपणीचं स्वप्न पुर्ण केले आणि बनला बुद्धिबळातला राजा- डी. गुकेश ठरला चेस मास्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *