म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या देशात वेगाने वाढत आहे. SIP द्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी लाखो लोक नियमित गुंतवणूक करतात. मात्र सध्या अनेक गुंतवणूकदारांना ई-मेल आणि एसएमएस मिळत आहेत — “Please update your FATCA declaration”. कारण FATCA अपडेट अपूर्ण असेल किंवा वेळेत री-व्हेरिफाय केले नसेल तर फंड हाऊस तुमच्या SIP पेमेंट्स थांबवू शकतात, आणि काही वेळा रिडेम्पशन सुद्धा ब्लॉक होऊ शकते. ही माहिती अनेकांना माहिती नसल्यामुळे एसआयपी अचानक थांबते आणि गुंतवणुकीची योजना बिघडते.
FATCA म्हणजे काय?
बहुतेक लोक KYC पूर्ण केल्यानंतर प्रक्रिया संपली असे मानतात, पण गेल्या काही वर्षांत एक नवीन आवश्यक टप्पा जोडला गेला — FATCA (Foreign Account Tax Compliance Act).
FATCA म्हणजे कायदेशीर घोषणापत्र ज्याद्वारे तपासले जाते की गुंतवणूकदारांचे अमेरिकेसोबत किंवा इतर परदेशी कर व्यवस्थांशी काही कर संबंध आहेत का.
हे विशेषतः लागू होते
- अमेरिकन नागरिक
- अमेरिकन ग्रीन कार्ड धारक
- परदेशात कर रहिवासी असलेले व्यक्ती
- अमेरिकेत उत्पन्न किंवा कर दाखल करणारे गुंतवणूकदार
जर ही माहिती KYC मध्ये अपडेट नसेल किंवा फाइलिंग कालबाह्य असेल, तर फंड हाऊस व्यवहार थांबवू शकतात. त्यामुळे KYC पूर्ण असले तरी FATCA अपडेट आवश्यक आहे.
FATCA स्टेटस अपडेट का महत्वाचे?
नियमांनुसार FATCA अटी पूर्ण नसतील तर फंड हाऊस खालील कृती करू शकतात —
नवीन गुंतवणूक थांबवणे
SIP/ STP नोंदणी थांबवणे
पेमेंट डिडक्शन थांबवणे
काही प्रसंगी रिडेम्पशनही रोखणे
म्हणून FATCA अपडेट न केल्यास वर्षानुवर्षे चालणाऱ्या SIP वर अचानक ब्रेक लागू शकतो. ही समस्या टाळण्यासाठी FATCA स्टेटस तपासणे आणि अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.
FATCA स्टेटस कसे तपासावे?
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि फक्त 2 मिनिटांत पूर्ण होते. प्रत्येक AMC च्या वेबसाइटला भेट देण्याची गरज नाही.
CAMS वेबसाइट
KFintech वेबसाइट
या दोन रजिस्ट्रार प्लॅटफॉर्मवर फक्त खालील माहिती भरावी —
- PAN
- जन्मतारीख
जर FATCA आधीच अपडेट असेल तर स्क्रीनवर “Compliant” असा मेसेज येईल
अपडेट आवश्यक असेल तर OTP आधारित छोटा ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल
तसेच पुढील अॅप्सद्वारेही FATCA स्टेटस तपासता येते —
- myCAMS
- MF Central
- विविध AMC Apps (Mutual Fund House Apps)
अॅपमधील Profile / KYC / FATCA विभागात स्टेटस झटपट पाहता येते.
FATCA अपडेट करताना कोणती माहिती लागते?
अपडेट फॉर्म भरताना साधारणपणे पुढील माहिती विचारली जाते —
- PAN
- व्यावसायिक तपशील
- जन्मतारीख
- Nationality
- Tax Residency देश
- US Taxpayer Status (Yes / No)
- मोबाईल OTP व ईमेल OTP पडताळणी
सामान्य भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा संपूर्ण फॉर्म 1–2 मिनिटांत पूर्ण होतो आणि SIP अनिंटरप्टेड सुरू राहते.
FATCA अपडेट न केल्यास काय होऊ शकते?
| FATCA अपडेट | गुंतवणूक स्थिती |
|---|---|
| अपडेट केले | SIP / नवीन गुंतवणूक / रिडेम्पशन सुरू |
| अपडेट नाही | SIP थांबू शकते, नवीन गुंतवणूक आणि कधीकधी रिडेम्पशनही ब्लॉक |
म्हणून फंड हाऊसेस मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना फॅट्का अपडेट करा असा मेसेज पाठवत आहेत.
अजूनही FATCA स्टेटस तपासले असेल तर लगेच करा चेक!
SIP सुरू ठेवायची असेल, नवीन गुंतवणूक करायची असेल किंवा आर्थिक योजना बिघडू नये असे वाटत असेल तर तात्काळ FATCA स्टेटस तपासणे आणि अपडेट करणे अत्यंत महत्वाचे आहे.
यासाठी फक्त 2 मिनिटे देऊन ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता येते —आज अपडेट केले तर उद्या SIP थांबण्याचा धोका शून्य!