होर्मुझ सामुद्रधुनी : मुंबई-पुण्याएवढंच अंतर, पण हा जलमार्ग बंद होण्याच्या भीतीनं जग का घाबरलंय? तिसऱ्या महायुद्धाची नांदी? पाहूया या विषयी अधिक माहिती-
होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग हा जलमार्ग आकारानं लहान असला, तरी हा जगातला सर्वात महत्त्वाचा जहाजांसाठीचा जलमार्ग आहे. पाहूया या जलमार्ग आणि तिसरे महायुद्ध याचा काय आणि कसा संबंध आहे.

होर्मुझ बेटावरील निसर्गरम्य वातावरण आमि परिसर यावरून या ठिकाणास, होर्मुझची सामुद्रधुनी म्हणले जाते, तसेच ओळखले जाते. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेनं इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ले केलं.
त्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीचा जलमार्ग बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्याप तसं काही ठोस समोर आलेलं नाही.पण, त्यानंतर या सामुद्रधुनीबद्दल चांगलीच चर्चा सुरू झाली.

पर्शिया अर्थात इराणच्या आखातात (Persian Gulf) शिरण्याचा हा मुख्य मार्ग आहे.
या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियाच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते.