IMF च्या दबावाखाली पाकिस्तानची अर्थव्यवस्था; शहबाज शरीफ सरकार मोठ्या संकटात!

IMF च्या दबावाखाली पाकिस्तानची अर्थव्यवस्था; शहबाज शरीफ सरकार मोठ्या संकटात!

IMF च्या दबावाखाली पाकिस्तानची अर्थव्यवस्था; शहबाज शरीफ सरकार मोठ्या संकटात

इस्लामाबाद | 20 ऑगस्ट 2025: पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड संकटात सापडली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून घेतलेल्या प्रचंड कर्जामुळे पाकिस्तानवर मोठा आर्थिक ताण आला आहे. सुरुवातीला दिलेल्या कर्जामुळे पाकिस्तानला दिलासा मिळेल असं वाटलं होतं, परंतु आता IMF थेट पाकिस्तानच्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवताना दिसत आहे.

IMF चे कठोर अटी

IMF ने पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारवर थेट आदेश देणे सुरू केले आहे. ताज्या घडामोडीनुसार, IMF ने पाकिस्तानला देशातील सेंट्रल बँकेच्या फायनान्स सेक्रेटरीला तात्काळ पदमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. एवढ्यावरच थांबता न, त्यांनी देशात नवे कायदे आणण्याचेही निर्देश दिले आहेत. या कायद्यांतर्गत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही व्यावसायिक बँकेची चौकशी करण्याचा अधिकार नसेल, अशी अट IMF ने घातली आहे.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानवर दबाव

2022 मध्ये IMF च्या दबावामुळे पाकिस्तानने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला स्वायत्तता दिली होती. परंतु आता IMF पुन्हा नव्या अटींवर जोर देत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील रिक्त असलेल्या दोन ‘उप-गव्हर्नर’ पदे तातडीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकार आणि IMF मध्ये सुरू चर्चा

पाकिस्तान सरकारने IMF च्या सर्व मागण्या अद्याप अधिकृतपणे मान्य केलेल्या नाहीत. या संदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र या अटींमुळे पाकिस्तानच्या सार्वभौम अर्थव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

चीनच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धक्के

पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना चीनचे परराष्ट्र मंत्री 21 ऑगस्टला पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहेत. याआधीच IMF चा दबाव वाढल्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांची चिंता अधिक वाढली आहे.

पाकिस्तान आधीच कर्जाच्या दलदलीत अडकला आहे. IMF कडून होत असलेले थेट आदेश आणि कठोर अटींमुळे आता पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानला आर्थिक आणि राजकीय पातळीवर आणखी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *