ND vs ENG: शुभमन गिलच्या डोक्यावर सामना सुरु असताना वेगवान चेंडू आदळला आणि काळजात धस्स झालं. त्यानंतर संघाचे डॉक्टर मैदानात धावत आहे. मैदानात नेमकं घडलं तरी काय, पाहा.. शुभमन गिलच्या डोक्यावर बॉल आदळल्याने सर्वच घाबरले, डॉक्टर आले धावत, अन् पाहा काय झाले! ND vs ENG: शुभमन गिलच्या डोक्यावर सामना सुरु असताना वेगवान चेंडू आदळला आणि काळजात धस्स झालं. त्यानंतर संघाचे डॉक्टर मैदानात धावत आहे. मैदानात नेमकं घडलं तरी काय, पाहा..
आपल्या भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलला मैदानात असताना डोक्यावर चेंडू आदळला आणि काळजात धस्स झालं. चेंडू एवढ्या वेगात आला की, तो शुभमन गिलला समजलाच नाही. शुभमन गिलच्या डोक्यावर हा चेंडू आदळला. ही गोष्ट एवढी धक्कादायक होती की, भारतीय संघाच्या डॉक्टरांनी त्वरीत मैदानात धाव घेतली. ही घटना घडली ती खेळाच्या ३७ व्या षटकात. आता काशी घडली ते जाणून घेऊ-
ज्यावेळी शुभमन गिलच्या डोक्यावर सामना सुरु असताना वेगवान चेंडू आदळला त्यावेळी भारताचा रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. जडेजा यावेळी अशी अचूक गोलंदाजी करत होता की, इंग्लंडच्या फलंदाजांना त्याने जखडून ठेवले होते. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न करत होते. ३७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही गोष्ट घडली. जडेजाचा चेंडू हा ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता आणि ब्रुक्स त्यावर मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण ब्रुक्सचे टायमिंग चुकले आणि त्यामुळे त्याचा हा फटका नीट बसला नाही. यावेळी चेंडूने ब्रुक्सच्या बॅटची कडा घेतली आणि तो चेंडू थेट स्लीपमध्ये असलेल्या शुभमन गिलच्या दिशेने गेला. हा चेंडू एवढ्या जलद गेला की, गिलला त्याचा अंदाज लागला नाही. हा चेंडी थेट गिलच्या कपाळाच्या दिशेने निघाला होता, गिलने हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला खरा, पण गिलला चेंडूता अंदाज आला नाही. त्यामुळे हा चेंडू थेट गिलच्या कपाळावर जाऊन आदळला.

शुभमन गिलला सुरुवातीला काहीच समजले नाही, तो थेट खालीच बसला. पण त्याचवेळी भारताच्या डॉक्टरांन मैदानात नेमकं घडलं तरी काय हे समजलं आणि त्यांनी मैदानात धाव घेतली. गिलवर डॉक्टरांनी उपचार करायला सुरुवात केली. त्यावेळी गिलला दुखत असल्याचं जाणवत होतं. त्यावेळी गिल मैदान सोडून जाईल, असे वाटत होते. पण त्यानंतर डॉक्टरांनी असे उपचार केले की, त्याला मैदानात राहता आले. त्यानंतरही गिल आपल्या कपाळावर हात लावून किती लागलं हे पाहत होता. गिलवर तात्पुरते उपचार केले गेले आहेत. पण जेव्हा उपहाराच्यावेळी संघ जाईल तेव्हा त्याच्यावर अजून चांगलेच उपचार केले जातील.
शुभमन गिल हा कर्णधार असल्यामुळे त्याने मैदानाबाहेर जाणे टाळले असावे. पण त्याच्यावर पुन्हा उपचार केले जातील आणि शक्य असेल तर वैद्यकीय चाचणीही केली जाईल. त्यानंतर गिलची ही दुखापत किती गंभीर आहे हे समजू शकेल आणि त्यानंतर त्याच्यावर काय उपचार करायचे, हे समजता येऊ शकते.