IND vs PAK U19: आशिया कप जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा सेलिब्रेशनवर वाद; व्हिडिओमुळे उडाली चर्चा!

अंडर-19 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतावर मोठा विजय मिळवलेल्या पाकिस्तान संघाच्या आनंदोत्सवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. हा पाकिस्तानचा अंडर-19 आशिया कप फायनलमधील पहिला विजय ठरला. या ऐतिहासिक यशानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने एक सेलिब्रेशन व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, काहींनी या सेलिब्रेशनवर टीकाही केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित गाणे आणि त्यावर आधारित नृत्य सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेंडमध्ये आहे.सामन्याचा विचार केला असता, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 347 धावांचा भक्कम डोंगर उभारला. सलामीवीर समीर मिन्हासने शानदार फलंदाजी करत 119 चेंडूत 172 धावा केल्या. हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे शतक होते.

प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव 156 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानने 191 धावांनी दणदणीत विजय मिळवला.या विजयानंतरचा सेलिब्रेशन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, क्रीडाप्रेमींमध्ये यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top