Indian astronaut space farming- धारवाड कृषी विद्यापीठातील वैज्ञानिकांचा प्रयोग
ही अभ्यासमोहीम भारतातील दोन प्रमुख संशोधन संस्थांमधील सहकार्याचा भाग आहे. कर्नाटकातील कृषी विद्यापीठ (University of Agricultural Sciences, Dharwad) येथील प्रा. रविकुमार होसामानी आणि IIT धारवाड येथील डॉ. सुधीर सिद्धापूरेड्डी हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. धारवाड कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या संकल्पनांना शुभांशू शुक्लांची साथ, मायक्रोग्रॅव्हिटीत स्टेम सेल्सवरही महत्वाचे संशोधन केले जात आहे.

आपल्या भारतातील प्रसिद्ध अंतराळवीर शुभांशू शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) असून, त्यांच्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी एक वेगळ्याच भूमिकेत महत्वाची कामगिरी बजावली आहे. अंतराळ शेतकरी म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडली आहे.
शुभांशु यांनी मेथी आणि मूग या बियांना अंकुर फुटतानाचे फोटो घेतले असून, या बिया सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात (microgravity) कशा प्रकारे उगम पावतात याच्या अभ्यासासाठी त्या स्टोरेजसाठी फ्रीझरमध्ये ठेवल्या आहेत. या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये बियांची उगम प्रक्रिया, सुरुवातीची वाढ, आनुवंशिक बदल, सूक्ष्मजैविक संवाद आणि पौष्टिक मूल्य यावर काय परिणाम होतो याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
अंतरिक्षातून ‘हे’ अंकुर आणले जाणार पृथ्वीवर
मेथी आणि मूग यांची स्पेस मध्ये शेती केली गेली. या प्रयोगात अंकुरलेल्या बिया पृथ्वीवर परत आणल्या जातील आणि त्यांच्यावर पुढील अनेक पिढ्यांपर्यंत अभ्यास केला जाईल. अंतराळातील स्थितींमुळे त्या बियांमध्ये झालेले बदल, त्यांचे आनुवंशिक परिणाम आणि भविष्यातील शेतीसाठी त्यांची उपयुक्तता याचा अभ्यास केला जाणार आहे, असे अॅक्सिओम स्पेसने PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सांगितले.
या साठी Microalgae संशोधन केले गेले
बियांच्या प्रयोगांशिवाय शुक्ला सूक्ष्म शैवाळांवरही काम करत आहेत. अन्न, प्राणवायू आणि जैवइंधन निर्माण करण्यासाठी सूक्ष्म शैवाळांचा वापर होऊ शकतो. अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांसाठी मानव जीवन टिकवण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्त्वाचे ठरू शकतात. शुक्ला एका अन्य प्रयोगात सहा प्रकारच्या पिकांच्या बियांवरही काम करत आहेत, ज्या अनेक पिढ्यांपर्यंत वाढवल्या जाणार आहेत.
धारवाड कृषी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केला प्रयोग-
या प्रयोगात भारतातील दोन प्रमुख संशोधन संस्थांमधील सहकार्याचा भाग आहे. कर्नाटकातील कृषी विद्यापीठ (University of Agricultural Sciences, Dharwad) येथील प्रा. रविकुमार होसामानी आणि IIT धारवाड येथील डॉ. सुधीर सिद्धापूरेड्डी हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत.