महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांची जागा आता शशिकांत शिंदे घेणार आहेत. जाणून घेऊया पूर्ण बातमी का आहे ते –

महाराष्ट्रात राजकीय समीकरणात मोठा बदल – जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि सात वर्षांपासून पक्षाचे नेतृत्व करणारे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, पक्षाकडून लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.
ही बदलाची प्रक्रिया आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नव्या नेतृत्वाची निवड ही पक्षाच्या नव्या रणनीतीचा भाग असल्याचे जाणकार मानतात.
स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत शिंदे 15 जुलै रोजी औपचारिकरित्या पदभार स्वीकारतील. पक्षाच्या आगामी कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले होते की, “मला पक्षाने अनेक संधी दिल्या, पण आता नव्या चेहऱ्यांना पुढे आणणे गरजेचे आहे. शरद पवार साहेब योग्य निर्णय घेतील, अशी मला खात्री आहे.” आज त्यांच्या त्या सूचनेला मूर्त स्वरूप मिळाले आहे.
संधी नव्या लोकांना दिली जाणार असे शशिकांत शिंदे म्हणाले-
बेरोजगारीचा प्रश्न आहे, आश्वासनं आहेत, 75 हजार नोकऱ्या लगेच देतो, निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात होईल हे लोकांना पटवून द्यायचं आहे. इनकमिंग आऊटगोईंग होत असते, नवीन लोकांना संधी देणे त्यांच्याकडन नेतृत्व उभं करणं हा साहेबांचा गुण आहे.
हा बदल पक्षाला नव्या दिशा देण्यासाठी कितपत प्रभावी ठरेल, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, राज्याच्या राजकारणात यामुळे हालचाल वाढणार, हे निश्चित!