भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनीअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जेईई (JEE – Joint Entrance Examination) ही परीक्षा देतात. मात्र अनेकदा विद्यार्थ्यांसह पालकांनाही एकच प्रश्न पडतो — जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्डमध्ये नेमका फरक काय? कोणत्या परीक्षेमुळे कुठे प्रवेश मिळतो? आणि तयारी कशी करावी?जेईई ही केवळ परीक्षा नसून, मर्यादित जागांसाठीची अत्यंत तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे योग्य माहिती, स्पष्ट नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव अत्यावश्यक ठरतो. या लेखात आपण जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्डमधील सर्व महत्त्वाचे फरक सविस्तरपणे समजून घेणार आहोत.
जेईई परीक्षा म्हणजे काय?
जेईई ही देशातील सर्वात मोठी इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा असून ती दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते –
जेईई मेन
जेईई ॲडव्हान्स्ड
दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम साधारणपणे 11वी-12वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांवर आधारित असतो. मात्र दोन्ही परीक्षांची कठीणता, पॅटर्न आणि उद्दिष्टे वेगवेगळी असतात.
जेईई मेन : पहिला टप्पा
जेईई मेन ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) घेतो. ही परीक्षा एक प्रकारे जेईई ॲडव्हान्स्डसाठीची स्क्रीनिंग टेस्ट मानली जाते.
जेईई मेनद्वारे प्रवेश कुठे मिळतो?
31 NIT (National Institutes of Technology)
26 IIIT (Indian Institutes of Information Technology)
सुमारे 26 GFTI (Government Funded Technical Institutes)अनेक सरकारी व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयेजेईई मेनमध्ये मिळालेल्या रँकच्या आधारेच फक्त निवडक विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्डसाठी पात्र ठरतात.
जेईई ॲडव्हान्स्ड :
आयआयटीचे प्रवेशद्वार
जेईई ॲडव्हान्स्ड ही परीक्षा दरवर्षी आलटून-पालटून देशातील वेगवेगळी आयआयटी घेतात.याच परीक्षेच्या आधारे देशातील 23 आयआयटींमध्ये प्रवेश मिळतो.जेईई मेन देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनाच जेईई ॲडव्हान्स्ड देण्याची संधी मिळते, त्यामुळे ही परीक्षा अधिक आव्हानात्मक ठरते.
परीक्षा किती वेळा देता येते?
जेईई मेन: एकूण 3 वेळा(12वीमध्ये असताना + पुढील सलग 2 वर्षे)
जेईई ॲडव्हान्स्ड: केवळ 2 वेळा(12वीमध्ये आणि त्याच्या पुढील वर्षी)
पात्रता (Eligibility)
जेईई देण्यासाठी विद्यार्थ्यांनी 12वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.सामान्य प्रवर्ग: 75% गुण किंवा बोर्डाच्या Top 20 Percentile मध्ये स्थानराखीव प्रवर्ग: 65% गुणTop 20 Percentile नियमामुळे विविध बोर्डांतील गुणफरकामुळे होणारा अन्याय टाळला जातो.
परीक्षेचा पॅटर्न
जेईई मेन:
3 तासांची Computer Based Test (CBT)Physics, Chemistry, Maths – समान वेटेजMCQ + Numerical Value प्रश्नMCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग
जेईई ॲडव्हान्स्ड:
दोन पेपर (Paper 1 आणि Paper 2) – प्रत्येकी 3 तासMCQ, Numerical, Matrix Match प्रकारचे प्रश्नप्रश्नांची संख्या व मार्किंग दरवर्षी बदलतेप्रश्न अधिक Conceptual आणि सखोल असतात
कठीणतेतील मुख्य फरक
जेईई मेन ही वेग, अचूकता आणि मूलभूत संकल्पनांवर आधारित असते.तर जेईई ॲडव्हान्स्डमध्ये विद्यार्थ्यांची सखोल समज, तर्कशक्ती आणि विश्लेषण क्षमता तपासली जाते.
तयारीची योग्य स्ट्रॅटेजी
तज्ज्ञांच्या मते, जेईईसाठी केवळ अभ्यास पुरेसा नसतो. Mock Tests आणि त्यांचे विश्लेषण हे यशाचे प्रमुख सूत्र आहे.नियमित मॉक टेस्ट द्याप्रत्येक टेस्टनंतर चुका, कमतरता ओळखावेळेचे योग्य नियोजन शिकामागील वर्षांचे प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे सोडवासतत अभ्यास करून स्वतःवर शंका घेऊ नका
ॲडव्हान्स्ड न झाल्यास पर्याय काय?
जेईई ॲडव्हान्स्ड उत्तीर्ण होऊनही अनेक विद्यार्थ्यांना आयआयटीत जागा मिळत नाही. मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी:NIT, IIIT, GFTIDTU, NSUTIISER, NISER (संशोधनासाठी)असे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असतात.निष्कर्षजेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षा एकमेकांशी जोडलेल्या असल्या तरी त्यांचा उद्देश वेगळा आहे. योग्य माहिती, स्पष्ट ध्येय आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल, तर कोणतीही परीक्षा अशक्य नाही. आयआयटी हे अंतिम ध्येय असले तरी, चांगला इंजिनीअर होण्यासाठी अनेक दर्जेदार मार्ग उपलब्ध आहेत.