77 रुपयांचा जिओ प्लॅन – डेटा सोबत SonyLIV चे फ्री सब्सक्रिप्शन! एशिया कप 2025 लाईव्ह पाहा!

77 रुपयांचा जिओ प्लॅन – डेटा सोबत SonyLIV चे फ्री सब्सक्रिप्शन, एशिया कप 2025 लाईव्ह पाहा!

जिओ ने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवीन आणि स्वस्त डेटा व्हाउचर आणले आहे. हा प्लॅन खास करून क्रिकेटप्रेमींसाठी तयार करण्यात आला आहे. कारण या प्लॅनसोबत मिळणाऱ्या SonyLIV च्या फ्री सब्सक्रिप्शनमुळे युजर्सना एशिया कप 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

जिओचा 77 रुपयांचा प्लॅन काय आहे?

जिओने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 77 रुपयांचा नवीन प्रीपेड डेटा व्हाउचर लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 3GB डेटा (4G आणि 5G स्पीडसह) मिळतो. याची वैधता 5 दिवसांची असते. मात्र डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64kbps पर्यंत कमी होतो.

OTT फायदे – SonyLIV मोफत

या प्लॅनची खरी खासियत म्हणजे OTT बेनिफिट्स. जिओ या प्लॅनसोबत SonyLIV चे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. जरी प्लॅनची वैधता 5 दिवसांची असली तरी SonyLIV चे OTT फायदे संपूर्ण 30 दिवसांसाठी लागू राहतात. त्यामुळे ग्राहकांना एका महिन्यासाठी SonyLIV वर उपलब्ध असणारे प्रोग्राम्स, स्पोर्ट्स आणि वेबसीरिजचा आनंद घेता येतो.

एशिया कप 2025 लाईव्ह स्ट्रीमिंग

सध्या सुरू असलेल्या एशिया कप सीरिज 2025 चे थेट प्रक्षेपण SonyLIV वर होत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा प्लॅन अतिशय किफायतशीर ठरत आहे. कमी पैशात डेटा आणि OTT फायदे मिळाल्याने हा प्लॅन युजर्समध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

कोणासाठी फायदेशीर?

जर तुमच्याकडे आधीच डेटा प्लॅन असेल पण SonyLIV सब्सक्रिप्शन नसेल, तर हा 77 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
तुम्ही तुमच्या Wi-Fi कनेक्शनसह SonyLIV चे एक महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन वापरू शकता.
मात्र या प्लॅनमध्ये फक्त डेटा आणि OTT फायदेच आहेत. कॉलिंग किंवा SMS सुविधा या प्लॅनमध्ये उपलब्ध नाहीत.

जिओचा हा 77 रुपयांचा नवीन प्लॅन म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक डबल फायदा – स्वस्त दरात डेटा + SonyLIV चे मोफत सब्सक्रिप्शन. यामुळे एशिया कप 2025 चे सर्व सामने मोबाईलवर कुठेही पाहता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top