महाराष्ट्र शासनाची डिजिटल सुविधा! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! जमिनीच्या 17 सेवा आता एका क्लिकवर!

महाराष्ट्र शासनाची डिजिटल सुविधा! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! जमिनीच्या 17 सेवा आता एका क्लिकवर!

शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! एका पोर्टलवर जमिनीच्या 17 महत्त्वाच्या सेवा घरबसल्या

पूर्वी जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागत, तासन्तास रांगेत उभं राहावं लागे आणि कधी कधी अनेक दिवसांचा वेळ वाया जाई. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती. मात्र आता महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल अत्याधुनिक करून हा त्रास कायमचा दूर केला आहे.

एकाच ठिकाणी 17 सेवा – वेळ, पैसा आणि श्रम वाचणार– महाराष्ट्र शासनाची डिजिटल सुविधा! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! जमिनीच्या 17 सेवा आता एका क्लिकवर!

नवीन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जमिनीशी संबंधित तब्बल 17 महत्त्वाच्या सुविधा घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. या सेवांमुळे केवळ वेळेचीच नाही, तर पैशाची आणि श्रमाची मोठी बचत होईल.

भूमी अभिलेख म्हणजे काय?– Bhumi Abhilekh

भूमी अभिलेख म्हणजे जमिनीची अधिकृत सरकारी नोंद. यात जमिनीच्या मालकीची, क्षेत्रफळाची, पिकांची माहिती, जमीन गहाण आहे का किंवा वादात आहे का यासारख्या सर्व महत्त्वाच्या तपशीलांचा समावेश असतो. खरेदी-विक्री, वारसा नोंदणी, कर्जासाठी अर्ज अशा अनेक कामांसाठी हे कागदपत्र अत्यावश्यक असतात.

डिजिटल युगातील भूमी अभिलेख सेवा

आता https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून शेतकरी आणि नागरिक सहजपणे खालील सुविधा घेऊ शकतात. काही सेवांसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते, तर काही सेवा मोफत आहेत.


पोर्टलवर उपलब्ध 17 प्रमुख सेवा:– Farmer Services

  1. डिजिटल स्वाक्षरीसह 7/12 उतारा – आता थेट ऑनलाईन मिळवा.
  2. 8-अ उतारा – डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध.
  3. फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज – जमिनीच्या नोंदीत बदल करण्याची सोय.
  4. फेरफार स्थिती तपासणी – अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या.
  5. मालमत्ता पत्रक व फेरफार अर्ज – ऑनलाईन अर्ज आणि प्राप्ती.
  6. ई-नकाशा/भू-नकाशा – जमिनीचा नकाशा डाउनलोड करा.
  7. ई-चावडी व महसूल भरणा – महसूल भरण्यासाठी सोपी सुविधा.
  8. ई-पीक पाहणी – पीक पाहणीची माहिती घरबसल्या.
  9. ई-मोजणी अर्ज – जमिनीचे मोजमाप करण्यासाठी ऑनलाईन अर्ज.
  10. अभिलेख पडताळणी – कागदपत्रांची स्वतः पडताळणी करा.
  11. प्रलंबित दिवाणी प्रकरणांची माहिती – प्रकरणांची सद्यस्थिती जाणून घ्या.
  12. ई-अभिलेख – डिजिटल स्वरूपातील अभिलेख.
  13. ई-कोर्ट संबंधित माहिती – न्यायालयीन माहिती पाहण्याची सोय.
  14. वारसा नोंदणी अर्ज – घरबसल्या अर्ज सादर करा.
  15. जमीन गहाण माहिती – गहाण स्थिती जाणून घ्या.
  16. पिकांची नोंद – जमिनीवरील पिकांच्या तपशीलाची नोंद.
  17. जमिनीवरील वाद स्थिती – वादग्रस्त जमीन असल्यास माहिती मिळवा.

शेतकऱ्यांसाठी फायदे

या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची अधिकृत कागदपत्रे कोणत्याही वेळेस, कुठूनही मिळू शकतात. पूर्वी प्रमाणपत्र किंवा उतारे मिळवण्यासाठी दिवसन्-दिवस लागायचे, ते आता काही मिनिटांत मिळतात. ही सुविधा केवळ वेगवान नाही, तर पारदर्शकही आहे. पारदर्शकता आणि सुलभता

भूमी अभिलेख पोर्टलमुळे सरकारी कामकाज अधिक सुलभ झाले असून भ्रष्टाचारावरही आळा बसणार आहे. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना आता बेकायदेशीर दलालांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. एका पोर्टलवर 17 सेवा उपलब्ध करून देणे हे खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीचं उदाहरण आहे. तुमच्या शेती किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतंही काम असेल, तर आता ते काही क्लिकमध्ये पूर्ण होऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *