MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती सुरू – ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 06 ऑगस्ट

MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती सुरू – ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 06 ऑगस्ट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 रिक्त पदांसाठी भरती जाहीर! अर्ज करा 06 ऑगस्ट 2025 पूर्वी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank), ही 1911 साली स्थापन झालेली एक नामवंत सहकारी बँक असून तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात 57 शाखा असून 6 प्रादेशिक कार्यालयांतून बँकेचा कारभार चालतो. सध्या बँकेचा वार्षिक व्यवसाय ₹61,947 कोटींपर्यंत असून ₹5,396 कोटींच्या निव्वळ मालमत्तेसह ही बँक प्रगतीपथावर आहे.

MSC Bank ने शिपाई, चालक, टायपिस्ट, कनिष्ठ अधिकारी आणि सहकारी पदांसाठी एकूण 167 रिक्त जागा जाहीर केल्या असून पात्र उमेदवारांकडून 06 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची महत्त्वाची माहिती Bank jobs Maharashtra साठी

  • संस्था: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank)
  • एकूण जागा: 167
  • पदांची नावे: शिपाई, चालक, टायपिस्ट, कनिष्ठ अधिकारी, सहकारी
  • शैक्षणिक पात्रता: 10वी पास ते कोणत्याही शाखेतील पदवीधर (50% गुणांसह)
  • वयोमर्यादा: किमान 18 ते कमाल 30 वर्षे
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन (https://www.mscbank.com/Careers.aspx)
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025

पदनिहाय पात्रता तपशील- MSCRecruitment2025/ Bank jobs Maharashtra

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह + मराठी विषयासह मॅट्रिक
प्रशिक्षणार्थी सहकारीकोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह + मराठी विषयासह मॅट्रिक
प्रशिक्षणार्थी टायपिस्ट (सहयोगी श्रेणी)कोणत्याही शाखेतील पदवी + मॅट्रिकमध्ये मराठी विषय आवश्यक
प्रशिक्षणार्थी चालकमॅट्रिक पास + मराठी विषय + वैध LMV ड्रायविंग लायसन्स
प्रशिक्षणार्थी शिपाईमॅट्रिक पास + मराठी विषय आवश्यक

अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

  • उमेदवाराने वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची खात्री करावी.
  • भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा मुलाखत होऊ शकते.
  • सर्व सूचना व अद्यतने MSC Bank च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतील:
    https://www.mscbank.com/Careers.aspx
  • अर्ज करण्यास शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025 ही अंतिम आहे.

ही सुवर्णसंधी गमावू नका! आजच ऑनलाईन अर्ज करा आणि प्रतिष्ठित बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *