पाहूया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा विषयी माहिती: महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

पाहूया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा विषयी माहिती: महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

Kabaddi: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताने पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली आहे. कारण महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोन्ही संघांनी कोणत्या संघांवर विजय मिळवले, जाणून घ्या संपूर्ण माहिती कबड्डी स्पर्धा विषयी –

मुंबई:- महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी “१ल्या १८वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रेमनगर आश्रम, राणीपूर जवळ, हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या मुलींच्या इ गटात महाराष्ट्राने झारखंडवर ५०-१६ अशी सहज मात करीत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. आक्रमक सुरुवात करीत महाराष्ट्राने पूर्वार्धात ३५-१० अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्र्चित केला. अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश जिल्हा कबड्डी असो.च्या विद्यमाने रोशनबाग बंदिस्त क्रीडा संकुलात आजच्या सायंकाळच्या सत्रातील ग गटात महाराष्ट्राच्या मुलींनी चुरशीच्या लढतीत चंदीगडला ५१-४७ असे रोखत बाद फेरी गाठण्याचा आपला मार्ग मोकळा केला.

उत्तरार्धात त्याच जोशात खेळ करीत गुणांचे अर्धशतक गाठले. बिदिशा सोनार, सेरेना म्हसकर यांचा चढायांचा झंझावात थोपविणे झारखंडला जमले नाही. प्रतीक्षा गुरव हिचा बचाव उत्कृष्ट होता. यांच्या खेळामुळे महाराष्ट्राला हा विजय सोपा गेला. या इ गटात महाराष्ट्रसह झारखंड व छत्तीसगड हे संघ आहेत. या गटात विजेतेपद मिळवायचे असेल तर महाराष्ट्राला छत्तीसगडला पराभूत करावे लागेल.

मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने इ गटात केरळचा ५४-२४ असा दारुण पराभव केला. बचाव व आक्रमणावर समांतर भर देत मुलांनी विश्रांतीलाच २१-०८ अशी आघाडी घेतली होती. नंतर देखील आपला खेळात सातत्य राखत गुणांचे अर्धशतक पार करीत सामना एकतर्फी केला.

या स्पर्धे मध्ये स्वराज मुळे, अथर्व सोनवणे यांच्या तुफानी चढाया त्यांना जीवन जाधव, प्रसाद दिघोळे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सहज शक्य झाला.केरळच्या संघाला उत्तरार्धात थोडा फार सूर सापडला. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. या गटात महाराष्ट्रा सह दिल्ली व केरळ हे अन्य संघ आहे. या गटाचे जेतेपद मिळविण्याकरिता महाराष्ट्राला दिल्लीचे आव्हान पेलावे लागेल. असे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *