वैवाहिक आयुष्यातल्या वादळ आणि घटस्फोटा बाबत सुपेरस्टार ‘नयनतारा’ चा खुलासा! जाणून घेऊया काय खरं आहे ते!

वैवाहिक आयुष्यातल्या वादळ आणि घटस्फोटा बाबत सुपेरस्टार ‘नयनतारा’ चा खुलासा! जाणून घेऊया काय खरं आहे ते!

Nayantara साऊथ इंडस्ट्रीतली लेडी सुपस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा सध्या चर्चेत आहे. तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत.

Nayanthara’s response to Divorce rumours: साऊथ सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या अफवांवर नयनतारानं प्रतिक्रिया देत, एक पोस्ट शेअर करून या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.. अनेक मोठ्या सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटांची बरीच चर्चाही रंगली.

आता आणखी एका सेलिब्रिटी कपलच्या आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र चर्चेला हवा मिळण्यापूर्वीच या अभिनेत्रीनं या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. कपल गोल्स देणाऱ्या सेलिब्रिटी जोडप्यांनी घटस्फोटाच्या पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांना एकच धक्का बसतो. गेल्या काही वर्षात हे अनेकदा घडलं. अनेक मोठ्या सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटांची बरीच चर्चाही रंगली.

साऊथ सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या अफवांवर नयनतारानं प्रतिक्रिया देत, एक पोस्ट शेअर करून या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

नयनतारा आणि विघ्नेश यांचा घटस्फोट –

नयनतारा आणि विग्नेश यांच्या घटस्फोटाच्या बातम्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होत्या. एका व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये नयनतारानं तिच्या लग्नाला मोठी चूक सांगितल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळं त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

या अफवांना उत्तर देताना नयनतारानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये ती आणि विग्नेश दोघेही आश्चर्यकारक हावभाव करताना दिसत आहेत. तिनं लिहिलं की, ‘जेव्हा लोक आमच्याबद्दल नको त्या विचित्र चर्चा करत असतात’.

नयनतारा आणि विग्नेशन 2022 मध्ये लग्न केलंय. लग्नानंतर काही दिवसातच ते जुळ्या मुलांचे पालक बनले. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतात. दोघेही नेहमीच एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्यातील स्ट्रॉंग बाँडिंग नेहमीच दिसून येतं. अशा परिस्थितीत घटस्फोटाच्या बातम्या केवळ खोट्या आणि निराधार असल्याचं समोर आलंय.

नंतर केले बॉलिवूडमध्ये यशस्वीरित्या पदार्पण

कामाबद्दल बोलायचं झालं तर लग्नानंतर तिनं काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर मुलांसाठी वेळ देणं प्राधान्य असल्याचही तिनं सांगितलं होतं. त्यानंतर नयनतारानं शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता ती मोजकेच सिनेमे करताना दिसते. काही महिन्यांपूर्वी धनुष सोबत झालेल्या वादामुळंही ती चर्चेत आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *