
NCERT च्या नव्या इतिहास पुस्तकात मुघल राजांविषयी मोठे बदल; बाबर क्रूर तर औरंगजेब विध्वंसक!
इयत्ता आठवीच्या नवीन समाजशास्त्र पुस्तकांमध्ये मुघल साम्राज्याशी संबंधित माहितीमध्ये एनसीईआरटी (NCERT) बोर्डाने काही महत्वाचे आणि वादग्रस्त बदल केले आहेत. इतिहासात अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या मुघल शासकांबाबत आता अधिक स्पष्ट आणि थेट मांडणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी नव्याने जाणीव निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन पाठ्यपुस्तकांनुसार, मुघल साम्राज्याचा पाया घालणारा बाबर हा एक…