Sassoon Hospital Recruitment 2025: ३५४ पदांसाठी तब्बल २६ हजार अर्ज; पुण्यातून सर्वाधिक अर्ज
पुणे | 13 सप्टेंबर 2025: ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ३५४ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या भरतीसाठी एकूण ३० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी पडताळणीनंतर २६ हजार १०१ अर्ज पात्र ठरले आहेत. लवकरच या पदांसाठी लेखी परीक्षा होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
ससून रुग्णालयात चतुर्थ श्रेणी अंतर्गत खालील पदांसाठी ही भरती होत आहे:
- कक्षसेवक – 168
- आया – 38
- सेवक – 36
- पहारेकरी – 23
- शिपाई – 2
- क्ष-किरण सेवक – 15
- हमाल – 13
- रुग्णपटवाहक – 10
- सहायक स्वयंपाकी – 9
- नाभिक – 8
- स्वयंपाकी सेवक – 8
- प्रयोगशाळा सेवक – 8
- बटलर – 4
- दवाखाना सेवक – 4
- माळी – 3
- प्रयोगशाळा परिचर – 1
- भांडार सेवक – 1
- गॅस प्रकल्प चालक – 1
एकूण 354 पदे भरण्यात येणार आहेत.
सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यातून?
भरती प्रक्रियेला राज्यभरातून उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा सर्वाधिक आघाडीवर असून जवळपास दहा हजार अर्ज केवळ पुण्यातून आले आहेत.
- पुणे – 9,950
- छत्रपती संभाजीनगर – 1,896
- नांदेड – 1,694
- अमरावती – 1,236
- लातूर – 1,170
- अहिल्यानगर – 1,051
भरती का महत्त्वाची?
ससून रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अनेक वर्षांपासून कामाचा ताण वाढला होता. रुग्णालयातील स्वच्छतेची समस्या वाढली होती आणि रुग्णांना स्ट्रेचरवर हलविण्यासाठी नातेवाईकांनाच पुढे यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने पदभरतीस मान्यता दिली आहे. भरतीनंतर रुग्णालयातील कामकाज सुलभ होणार असून रुग्णसेवा अधिक वेगवान होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
Sassoon Hospital Bharti 2025 ही केवळ रोजगाराची संधी नसून रुग्णालयातील मूलभूत सेवा सुधारण्याची मोठी पायरी आहे. पात्र उमेदवारांना आता परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे. लवकरच या पदभरतीसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर होतील.