SBI मध्ये मेगाभरती; अर्ज करण्यासाठी काय आहे तारीख शेवटची? स्वप्न होणार तुमचं सरकारी नौकारीची!

SBI मध्ये मेगाभरती; अर्ज करण्यासाठी काय आहे तारीख शेवटची? स्वप्न होणार तुमचं सरकारी नौकारीची!

स्टेट बँक ऑफ इंडियाने ५४१ प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवार १४ जुलै २०२५ पर्यंत sbi.co.in वर अर्ज करू शकतात. वयोमर्यादा २१-३० वर्षे आहे. परीक्षा प्रक्रिया प्राथमिक, मुख्य परीक्षा, सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखतीचा समावेश करते.

जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी मोठी भरती काढली आहे. एकूण ५४१ रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यानुसार पदवीधर तरुणांना SBI मध्ये अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन १४ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती अभियानांतर्गत ५०० नियमित पदे आणि ४१ बॅकलॉग रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पात्रता काय?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरु शकतो. तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टरमध्ये असाल, तरीही अर्ज करू शकता. मात्र, मुलाखतीसाठी निवड झाल्यास तुम्हाला ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. त्यासोबत मेडिकल, इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट (CA), कॉस्ट अकाउंटंट (CMA) यांसारख्या व्यावसायिक पदव्या असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

यासाठी तुमचे वय १ एप्रिल २०२५ पर्यंत २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

परीक्षेचे वेळापत्रक

प्राथमिक परीक्षेचे कॉल लेटर: जुलै २०२५ च्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात
प्राथमिक परीक्षा: जुलै/ऑगस्ट २०२५ मध्ये
प्राथमिक परीक्षेचा निकाल: ऑगस्ट/सप्टेंबर २०२५ मध्ये
मुख्य परीक्षेचे कॉल लेटर: ऑगस्ट/सप्टेंबर २०२५ मध्ये
मुख्य परीक्षा: सप्टेंबर २०२५ मध्ये
मुख्य परीक्षेचा निकाल: सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२५ मध्ये
सायकोमेट्रिक टेस्ट, मुलाखत आणि गट चर्चा: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ मध्ये
अंतिम निकाल: नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२५ मध्ये
तरुणांसाठी उत्तम संधी
बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *