जर तुम्ही सहा महिने दारू सोडली तर काय होईल? तज्ज्ञ सांगतात फायदे-
No Alcohol Benefits: जर तुम्ही दारू पूर्णपणे सोडली, तर नक्की काय होतं? जाणून घेऊ या…

जर तुम्ही सहा महिने दारू सोडली तर काय होईल फायदा? पुर्णपणे दारू सोडली तर काय होत? डॉ. अनिकेत मुळे (इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरा रोड) यांनी सांगितले, “जेव्हा एखादी व्यक्ती दारू सोडायचं ठरवते, तेव्हा तिला लगेचच काही चांगले फायदे दिसू लागतात आणि ते हळूहळू वाढत जातात. सहा महिने दारू न घेतल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यात खूप सकारात्मक बदल होतात. जर यकृताचं आधीच काही नुकसान झालं असेल, तर ते हळूहळू भरून येऊ लागतं आणि त्याचं काम सुधारू लागतं”. असे डॉ. मुळे यांनी सांगितले. दारू सोडण्याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, दारू आरोग्यास हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर तुम्ही दारू पूर्णपणे सोडली, तर नक्की काय होतं?
“दारू सोडल्यानंतर शरीरातील ऊर्जा स्तर (energy level) संतुलित राहतो, झोपेचा दर्जा सुधारतो आणि झोप नियमित होते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. मानसिक आरोग्यही सुधारते. माणूस कमी चिंताग्रस्त वाटतो, भावनिकदृष्ट्या संतुलित राहतो आणि कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो”.
डॉ. कुशल बांगड (सल्लागार डॉक्टर, एआयएमएस हॉस्पिटल, डोंबिवली) यांनी सांगितले, “दारू सोडल्यानं यकृत मजबूत होतं, मन शांत होतं, मूड सुधारतो आणि जवळच्या लोकांशी असलेलं आपलं नातं अजून घट्ट होतं. जर स्वतःसाठी नाही, तर किमान तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी दारू सोडा.
तर याच विषयी याबाबत Dr. मुळे म्हणाले, “दारू न घेतल्याने नातेसंबंधही चांगले होऊ लागतात. कारण- संवाद सुधारतो आणि माणूस भावनिक व शारीरिकदृष्ट्या उपलब्ध राहतो. जेव्हा एखादी व्यक्ती सहा महिने दारू घेत नाही, तेव्हा त्यामध्ये असलेली मानसिक ताकद, शिस्त आणि आयुष्यात चांगले व कायमस्वरूपी बदल घडविण्याची क्षमता दिसून येते”.
तर आपले नाते तसेच आरोग्य आणि सामाजिक प्रतिष्ठा ठीक ठेवण्यासाठी आपण दारू ही सोडायलाच हवी. असा सल्ला विशेष सल्लागार डॉ. कुशल बांगड आणि डॉ. मुळे यांनी दिला आहे.