भाजपचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश! अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंड मध्ये होणार कार्यक्रम!

स्वप्निल शहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना — अजित पवारांच्या उपस्थितीत ऐतिहासिक क्षण

भाजपचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश! भाजपचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश! दौंड तालुक्यात स्वप्निल शहा आणि नंदू पवार यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला निश्चितच राजकीय बळकटी मिळणार आहे.
भाजपमधील सक्रिय कार्यकर्ते आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली येत असल्याने आगामी निवडणुकीत पक्षाला नवे ऊर्जास्रोत आणि जनाधार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश दि. 17 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये पार पडणार आहे. स्वप्निल शहा यांनी पत्रकार परिषदेत हे जाहीर केले.

पत्रकार परिषदेत स्वप्निल शहा म्हणाले की, त्यांनी भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केले आणि पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. भाजपमधील कोणत्याही सदस्यांशी वैयक्तिक वाद नसतानाही काही कारणास्तव त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधला.

अजित पवार यांच्या कामाने प्रेरित निर्णय

स्वप्निल शहा यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या कामाचा झंझावात पाहून ते प्रभावित झाले आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्षात प्रवेश केल्यानंतर, ते पक्षाच्या कामात निष्ठेने सहभागी होतील आणि दिलेल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करतील.

दौंड नगरपालिका निवडणुकीतील भूमिका

स्वप्निल शहा आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नंदू पवार तसेच त्यांच्या सहकारी दौंडच्या आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व इतर सदस्य निवडण्यात मदत करतील. या प्रवेशामुळे पक्षाला निश्चितच फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्वप्निल शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा स्थानिक राजकारणात मोठा बदल आणण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणारा हा कार्यक्रम स्थानिक राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरणार आहे.

स्वप्निल शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश हा दौंडच्या राजकारणात नवा टप्पा ठरणार आहे. भाजपचा जुना कार्यकर्ता आणि प्रभावशाली नेता असलेला शहा आता अजितदादांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top