भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरु असून, बीसीसीआयमधील काही पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, “आम्हीदेखील विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये मिस करतोय. त्याचं मैदानावरील उपस्थिती, ऊर्जा आणि लढवय्या वृत्ती संघासाठी अमूल्य आहे.”
इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात (Team India) स्थान मिळणार नसल्याच्या शक्यतेमुळे या दोघांनीही निवृत्ताचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र, आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघ 2-1 असा पिछाडीवर पडल्यानंतर विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन भारतीय कसोटी संघात परतावे, अशी मागणी होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (India Vs England Test Series)
राजीव शुक्ला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की, भारताच्या कसोटी संघात आम्हालाही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची उणीव जाणवत आहे. परंतु, विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्त होण्याचा निर्णय स्वत: घेतला होता. खेळाडूंच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयचे अत्यंत कठोर असे धोरण आहे. आम्ही कधीही कोणत्याही खेळाडूला कधी आणि कोणत्या प्रकारातून त्याने निवृत्त व्हावे, हे सांगत नाही. हा निर्णय ते खेळाडूच घेतात. त्याप्रमाणे विराट आणि रोहित या दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत भारताला अनेक मोठ्या विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका जिंकली आणि घरच्या मैदानावर अनेक संघांचा पराभव केला.
त्याने खेळलेली 100 हून अधिक कसोटी सामने हीच त्याच्या समर्पणाची साक्ष आहे. विराटने फक्त फलंदाज म्हणूनच नव्हे, तर एक प्रेरणादायी नेता म्हणूनही भारतीय संघात नवी ऊर्जा भरली.