एकाच डासातून दोन गंभीर आजार
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याला एकाच वेळी डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही डासांमुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे. या आजारांमुळे त्याला महत्त्वाच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असून सध्या तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहे. एकाच वेळी दोन्ही आजार होणे दुर्मिळ असले तरी ते अत्यंत धोकादायक ठरू शकते.
WHO काय सांगते?
WHO च्या माहितीनुसार, डेंग्यू आणि चिकनगुनिया हे दोन्ही आजार Aedes aegypti या संक्रमित मादी डासाच्या चाव्यामुळे पसरतात. हे डास प्रामुख्याने दिवसा चावतात आणि स्वच्छ साचलेल्या पाण्यात त्यांची पैदास होते. त्यामुळे कूलर, फुलदाण्या, बादल्या, टाक्या यामध्ये साचलेले पाणी मोठा धोका ठरू शकते.
डेंग्यूची गंभीर लक्षणे
डेंग्यू झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:तीव्र तापडोकेदुखीडोळ्यांच्या मागे वेदनास्नायू व सांधेदुखीउलट्यापोटात तीव्र वेदनानाक किंवा हिरड्यांतून रक्त येणेही लक्षणे डेंग्यू शॉक सिंड्रोमची संकेत असू शकतात.
चिकनगुनिया आणि दीर्घकाळ टिकणारी सांधेदुखी
चिकनगुनियामध्ये अचानक ताप येतो आणि त्यानंतर हात, पाय, मनगट, गुडघे यांच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. ताप उतरल्यावरही ही वेदना महिने किंवा कधी कधी वर्षानुवर्षे टिकू शकते. काही रुग्णांना फिजिओथेरपीची देखील गरज भासते.
ही 10 लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नका
सतत चढता तापअंगात तीव्र कणकणसांध्यांमध्ये सूजडोळ्यांमागील वेदनाथकवा आणि अशक्तपणाउलट्या किंवा मळमळत्वचेवर लाल चट्टेरक्तस्रावचक्कर येणेप्लेटलेट्स कमी होणे उपचार आणि बरे होण्यास लागणारा कालावधीडेंग्यू आणि चिकनगुनियावर ठराविक अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. उपचार हे लक्षणांवर आधारित असतात.डेंग्यूतून बरे होण्यासाठी साधारण 1 ते 2 आठवडे लागतातचिकनगुनियामध्ये वेदना दीर्घकाळ टिकू शकतातभरपूर द्रवपदार्थ, विश्रांती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे आवश्यक आहे.
डासांपासून बचावाचे प्रभावी उपाय’
या आजारांपासून वाचण्यासाठी डासांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.घराभोवती पाणी साचू देऊ नकाकूलर व टाक्या नियमित स्वच्छ करापूर्ण बाह्यांचे कपडे वापरामच्छर पळवणारी क्रीम/स्प्रे वापराखिडक्यांना जाळ्या आणि झोपताना मच्छरदाणी वापरा।
महत्त्वाची सूचना
हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.