मुंबईतील शिक्षण संस्थेत ७५ लाखांची फसवणूक – CBSE मान्यता मिळवण्याच्या नावाखाली मोठा घोटाळा उघड!

मुंबई प्रतिनिधी: माहीममधील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत CBSE मान्यता मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ७५ लाखांचा मोठा वित्तीय घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संस्थेतील चार आजी-माजी पदाधिकारी, एका खासगी संस्थेच्या संचालक तसेच महिला एजंट यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कसे उघडकीस आले प्रकरण?

संस्थेच्या तत्कालीन उपाध्यक्षांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर महिम पोलिसांनी तपास सुरू केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, नववी आणि दहावीचा CBSE अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता आवश्यक होती. मात्र आवश्यक सुविधा आणि मापदंड अपुरे असल्याने मान्यता मिळणे अवघड असल्याची शक्यता व्यक्त झाली होती.याच काळात पदाधिकाऱ्यांपैकी एका व्यक्तीने केंद्रात ओळखी असलेल्या महिला एजंटशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. एजंटने CBSE मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन देत थोड्या-थोड्या हप्त्यांत ७५ लाख रुपये स्वीकारले, ज्यातील काही रक्कम रोखीने दिल्याचे सांगितले जात आहे.

पैसे दिले, पण मान्यता मिळालीच नाही

रक्कम दिल्यानंतरही CBSE ने मान्यता नाकारली. त्यानंतर तक्रारदारांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली. चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे पुष्टीकरण झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी कोण?संस्था ट्रस्टचे चार आजी-माजी पदाधिकारीखासगी संस्थेची संचालिकामान्यता मिळवण्याची हमी देणारी महिला एजंटमहिम पोलिसांनी आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top