जनतेचा नेता, विकासाचा ध्यास- ‘राहुल दादा कुल’
दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल दादा कुल हे नाव घेताच प्रत्येक दौंडकराच्या चेहऱ्यावर आदर आणि विश्वास दिसून येतो. जनतेच्या हितासाठी दिवस-रात्र कार्य करणारे हे जननेते आपल्या लोकांशी अगदी जवळून जोडले गेले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण दौंड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
दौंड तालुक्याच्या विकासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे राहुल दादा कुल, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. राहुल सुभाषराव कुल हे दौंड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांची राजकीय आणि पारिवारिक पार्श्वभूमी म्हणजे जणू काही एक प्रेरणा आहे. राहुल दादा कुल यांच्या वडिलांनी अनेक वेळा आमदार म्हणून कार्य केले तर आई रंजना कुल या देखील आमदार होत्या. शिक्षणाच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास त्यांनी आपले LLB पूर्ण केले आणि आपले गाव दौंड येथून त्यांनी आपला राजकीय प्रवास आणि प्रचार सुरू केला आणि दौंड च्या प्रगतीला वेगवान दिशा दिली.
विकासाच्या वाटेवरील ठोस पावले
राहुल दादा कुल यांनी आपल्या कार्यकाळात गावोगावी रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि शेतीसाठी अनेक विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दौंड तालुका आज नव्या उंचीवर पोहोचला आहे.
त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या गरजा जाणून घेत, त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
जनतेशी संवाद – त्यांची खरी ताकद

राहुल दादा कुल यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे जनतेशी असलेला थेट संवाद. ते नेहमी लोकांमध्ये, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असतात. ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
न मागता देणारा आमदार – खऱ्या विकासाची दिशा ‘राहुल कुल’
खरा विकास तोच, जिथे लोकांना आपले हक्क मागावे लागत नाहीत आणि शासनाला आपले कर्तव्य आठवावे लागत नाही. समाजाच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठीची पायाभरणी होय. अशाच दूरदृष्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्याच्या प्रगतीसाठी अनेक असे प्रकल्प आणले, ज्यांची कोणी मागणी केली नव्हती. हे प्रकल्प केवळ विकासाचे प्रतीक नाहीत, तर लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारे आहेत.
बेबी कालवा – अर्धशतकानंतर पुन्हा सुरू
ब्रिटिश काळात झालेला बेबी कालवा पन्नास वर्षांपासून बंद होता. कोणीही त्याच्या पुनरुज्जीवनाची कल्पनाही केली नव्हती. मात्र, राहुल कुल यांनी या कालव्याकडे लक्ष देऊन त्याचे पुनरुत्थान करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कालवा पुन्हा कार्यान्वित झाला. आज या कालव्यामुळे दौंड आणि हवेली तालुक्यातील शेतकरी उन्हाळ्यातही हिरव्या शेतीचा आनंद घेत आहेत.
हा कालवा म्हणजे पाण्याचा नवा प्रवाहच नव्हे, तर आशेचा प्रवाह आहे. कोणी मागणी न करता मिळालेली सुविधा म्हणजे जबाबदार प्रशासन आणि संवेदनशील नेतृत्वाचे उदाहरण आहे.
खडकवासला ते फुरसुंगी बोगदा – पाणी बचतीचा अभिनव प्रकल्प
पाणी बचत हीच पाण्याची निर्मिती आहे, हे तत्व आमदार कुल यांनी ओळखले आहे. त्यांनी खडकवासला धरण ते फुरसुंगी भूमीगत कालवा (टनेल) प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाला तब्बल २१०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या टनेलमुळे ३ टीएमसी पाणी वाचणार असून, हे म्हणजे एका धरणाची निर्मितीच आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेतीला अधिक पाणी मिळेल, आणि पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावरचा ताण कमी होईल. अशा प्रकारचा विचार म्हणजे विकासाच्या मूळाशी असलेली संवेदनशीलता
हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूल – दळणवळणाची नवी क्रांती
अनेकदा आपण पाहतो की, लोकांनी मागणी केल्याशिवाय रस्ते बनत नाहीत. पण राहुल कुल यांनी कोणत्याही मागणीशिवाय हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूलाचा प्रकल्प हाती घेतला. या ६,००० कोटींच्या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून डीपीआर तयार केला गेला आहे.
हा पूल आणि रिंगरोड झाल्यावर पुणे ते मुंबई प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि पुरंदर विमानतळाच्या विकासाला हातभार लागेल.
दौंड तालुक्यात उपक्रीडा संकुल – ग्रामीण खेळाडूंसाठी सुवर्णसंधी
दौंड शहरात क्रीडा संकुल उभारले जात आहे, पण ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी सहा ठिकाणी मीनी उपक्रीडा संकुल उभारले जाणार आहेत. यामुळे ग्रामीण मुलांनाही खेळाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच न्हावरे–चौफुला महामार्गाचे रुंदीकरण करून त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर केले गेले आहे – हीदेखील लोकांनी न मागता मिळालेली सुविधा आहे.
मुळशी धरणाचे पाणी – भावी पिढ्यांसाठी पाण्याचा साठा
मुळशी धरणाचे पाणी खडकवासला प्रकल्पात आणणे हा राहुल कुल यांचा स्वप्नप्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पुढील अनेक पिढ्यांसाठी पाण्याची सोय होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली या प्रकल्पासाठी समिती नेमली गेली असून, त्यात राहुल कुल यांचा समावेश आहे. हा प्रकल्प दौंडच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल.
राहुल कुल यांच्या नेतृत्वात दौंड तालुका आज “मागणीपूर्व विकासाचा” आदर्श बनला आहे. लोकांच्या गरजा ओळखून काम करणारे नेतृत्व हेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बळ आहे. समाजाच्या कल्याणासाठी घेतलेले हे उपक्रम केवळ प्रकल्प नाहीत, तर लोकांच्या विश्वासाचा विजय आहेत.
राहुल दादा कुल – दौंड तालुक्याच्या प्रगतीचे मार्गदर्शक
दौंड तालुक्यातील नागरिक, शेतकरी, महिला बचत गट, युवक मंडळे आणि शाळकरी विद्यार्थी सुद्धा राहुल दादांना शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यांच्या कार्यामुळे दौंड तालुका आज विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे. दौंडच्या विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेच्या मनातील आमदार राहुल दादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राहुल दादा कुल यांचा हा नवा वर्षप्रवास समाजसेवेने, नव्या उर्जेने आणि विकासाच्या नव्या अध्यायांनी भरलेला असो, हीच सर्व दौंडकरांची शुभेच्छा!