ST Bus : नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा; भाडे आणि वेळापत्रक जाणाून घ्या
पुणे | 6 सप्टेंबर 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे विभागाकडून साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा पुण्यातील शिवाजीनगर आगारातून 27 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता सुरू होणार आहे.
यात्रेचे वेळापत्रक
या यात्रेत भाविकांना साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घडविण्यात येईल.
- पहिल्या दिवशी : कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर दर्शन आणि तुळजापूर येथे मुक्काम.
- दुसऱ्या दिवशी : माहूर येथील रेणुका देवी मंदिर दर्शन आणि मुक्काम.
- तिसऱ्या दिवशी : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनानंतर पुण्याकडे परतीचा प्रवास.
प्रवाशांसाठी विशेष सुविधा
- महिलांना ५०% सवलतीत प्रवास करण्याची संधी.
- ज्येष्ठ नागरिकांसाठीही सवलतीत प्रवास.
- प्रवाशांची संख्या वाढल्यास अतिरिक्त बसेस सोडण्यात येतील.
सध्या ३० प्रवाशांनी बुकिंग केले असून, अधिक भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजीनगरचे वरिष्ठ आगारप्रमुख संजय वाळवे यांनी केले आहे.
प्रवासी भाडे
- पुरुष प्रवासी : ₹3101
- महिला प्रवासी : ₹1549 (सवलत दर)
नवरात्रोत्सवात देवीदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे ही बस सेवा भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भाविकांनी नवरात्रोत्सवात सुरक्षित आणि सुखकर प्रवासासह साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घ्यावे, यासाठी एसटी महामंडळाची ही विशेष बस सेवा उत्तम पर्याय ठरणार आहे. बुकिंगसाठी इच्छुकांनी त्वरित शिवाजीनगर किंवा स्वारगेट आगारात संपर्क साधावा.